Share

‘सुर्यासमोर आमची काहीच औकात नाही’; ग्लेन मॅक्सवेल असं का म्हणाला? जाणून घ्या..

maxwell surya

ऑस्ट्रेलियन संघाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे. सूर्यकुमार यादव सध्या आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वत्र त्याला मोठी मागणी आहे.

बिग बॅश लीगमध्ये तुम्ही सूर्यकुमारला खरेदी करू शकता का, असे ऑस्ट्रेलियन संघाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला विचारण्यात आले. ज्यावर त्याने खळबळजनक उत्तर दिले आहे. जे जाणून तुम्हाला धक्का बसेल.

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल सध्या आपल्या एका विधानामुळे चर्चेत आहे. त्यांचे विधान 360 फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्याशी संबंधित आहे. मॅक्सवेल ‘द ग्रेड क्रिकेटर’ पॉडकास्टवर बोलत होता.

सूर्यकुमार यादवने 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आपले दुसरे टी-20 शतक झळकावून आपल्या फलंदाजीचा धडाका दाखवला. त्याच्या 51 चेंडूत नाबाद 111 धावांच्या खेळीने भारताला 65 धावांनी विजय मिळवून दिला.

“मला खेळ सुरू आहे हे माहित नव्हते. पण मी नंतर स्कोअरकार्ड पाहिलं आणि त्याचा फोटो फिंचला (आरोन फिंच) पाठवला आणि म्हटलं, ‘हा माणूस काय करतोय? तो पूर्णपणे वेगळ्या ग्रहावर फलंदाजी करत आहे! इतरांचे स्कोअर पहा आणि याचा पहा.

मग त्याला 50 चेंडूत 111 धावा केलेल्या आम्ही पाहील्या. मी दुसर्‍या दिवशी डावाचे रिप्ले पाहिले आणि मला हे पटलं आहे की तो इतरांपेक्षा खूपच चांगला खेळत आहे. तो आमच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा सरस आहे.”

भारतात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना जगातील सर्व लीगपेक्षा जास्त पैसा मिळतो. त्यामुळे जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही भारतीय कोणत्याही देशांतर्गत टी-२० लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

असे असूनही, बिग बॅश लीगमध्ये तुम्ही सूर्यकुमारला विकत घेऊ शकता का, असा प्रश्न मॅक्सवेलला विचारण्यात आला. ज्यावर ग्लेन मॅक्सवेल हसला आणि म्हणाला, “आमच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याला खरेदी करणे बिग बॅश लीगमध्ये परवडणार नाही. आम्हाला सर्वांना संघाबाहेर काढावे लागेल, पैसे वाचवावे लागतील आणि मग सुर्याला विकत घ्यावे लागेल”

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now