Share

”विराट कोहली, बाबर आझम आणि नऊ लाकडाचे तुकडे द्या, याच्यातच वर्ल्ड कप जिंकून दाखवेन”

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची गणना सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. दोन्ही खेळाडूंची तुलनाही रोज होत राहते. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रशीद लतीफ याने या दोघांबद्दल अशी कमेंट केली आहे जी याआधी क्वचितच कोणत्याही माजी क्रिकेटपटूने केली असेल.(give-virat-kohli-babar-azam-and-nine-pieces-of-wood-to-win-the-world-cup

माझ्या संघात विराट कोहली(Virat Kohli) आणि बाबर आझम(Babar Azam) असले आणि फक्त नऊ लाकडी तुकडे असले तरीही मी विश्वचषक जिंकू शकतो, असे रशीद म्हणाला. लतीफच्या विधानाने मँचेस्टर युनायटेडचे ​​माजी व्यवस्थापक सर अॅलेक्स फर्ग्युसन यांची आठवण करून दिली, जे म्हणायचे कि, मला 10 लाकडाचे तुकडे द्या आणि झिनेदिन झिदान द्या, मी संघाला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देऊ शकतो.

बाबरने 2016 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तो पाकिस्तानसाठी एकूण 40 कसोटी, 86 एकदिवसीय आणि 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने(International front) खेळला आहे. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 2851, 4261 आणि 2686 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे तर त्याने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराटने भारतासाठी 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 97 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटने अनुक्रमे 8043, 12311 आणि 3296 धावा केल्या आहेत.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now