Share

heart attack : सावधान! आजच सोडून द्या ‘या’ चार सवयी नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका

health habits

heart attack: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि रोजच्या धावपळीच्या दिनक्रमामुळे हृदयविकाराचे प्रमाण लोकांमध्ये दिवसोंदिवस वाढत आहे. कामाचा तणाव वाढला त्याप्रमाणे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. चमचमीत फास्टफूडवर ताव मारला जातो. मात्र हृदयाचे आरोग्य नीट ठेवायचे असेल तर काय टाळायला हवं? याबद्दल आपण जाणून घेऊया.

आपल्या कोणाचेही खाण्यावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयविकाराची सुरुवात हाय कोलेस्ट्रॉलपासून होते. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होताना उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे रक्तदाब वाढीचा विकार होतो. त्यानंतर हृदयाचे आरोग्य बिघडते.

हृदयविकाराचा झटका येऊन त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आज समाजात आहे. हृदयविकारापासून वाचायचे असेल तर या चार गोष्टी खाणे टाळा. तेलकट पदार्थ- तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल तयार होतं. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. तेलकट, चमचमीत पदार्थांवर ताव मारत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा.

प्रोस्टेट मीट- बहुसंख्य लोक आता शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढावे म्हणून प्रोस्टेट मीट खाण्यावर भर देतात. मात्र प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे उच्च रक्तदाब उद्भवू शकतो व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

सिगारेट, दारू- बदलत्या जीवनशैलीसोबत मद्यपान करणे आणि सिगारेट ओढणे, ही आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र सिगारेट, दारूमुळे हृदय आणि यकृताची मोठ्या प्रमाणात हानी होते. या सवयींमुळे हाय बीपी, हार्ट फेल्यूअर उद्भवू शकते. त्यामुळे या सवयीत वेळीच बदल करा.

सॉफ्ट ड्रिंक- आजकाल तरुणांपासून लहान मोठ्यांपर्यंत सगळेजण फ्रेश व एनर्जेटिक वाटावे, म्हणून सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करतात. सॉफ्ट ड्रिंकमध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा हृदयाला धोका असतो. ही सवयी वेळीच बदलावी. आपल्या खाण्याच्या पद्धतीत बदल केल्याने आपण हृदयविकाराच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकतो.

महत्वाच्या बातम्या-
Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका
शरद पवारांच्या नातीचा युरोपात डंका; अशी कामगिरी केली की संपुर्ण देशाला अभिमान वाटेल
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now