विद्यार्थी संघटना(Student Union): कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर आले होते. त्यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आणि मग निर्बंध लागले. सर्व सण समारंभ यावर बंधने आली. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री हे सर्व घरातल्या घरात साजरे करावे लागले. आता काहीसे संकट टळल्यासारखे वाटत आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण थाटामाटात साजरे करण्यास परवानगी दिली आहे.
त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुद्धा यावर्षी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. यासाठी विद्यार्थी संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर या काळात परीक्षांचे आयोजन करू नये. अशाप्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करण्यात याव्या, अशी मागणीदेखील अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.
या मागणीला अनेकांचे समर्थन दिसत आहे तर अनेक लोक विरोधही करीत आहे. काहींचे म्हणणे असे की, गणेशोत्सव आणि शाळा महाविद्यालयाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो. कोरोनामुळे आधीच मुलांच्या शिक्षणावर बराचसा परिणाम झालेला दिसून येत आहे. अनेक मुलांचे शिक्षण सुटले. त्यामुळे गणेशोत्सवात कशाला शाळेला सुट्टी?
धार्मिकता आणि शिक्षण एकमेकांशी जोडू नका. १ जूनला शाळा सुरु करा आणि गणपतीला ११ दिवस सुट्या द्या. हा चुकीचा निर्णय आहे प्रत्येक सणाला सुट्या देत बसलं तर वर्षभरात मुलांचा सिलॅबस पूर्ण होईल का? गणेशोत्सवाला सुटी देत असाल तर मग प्रत्येकच सणाला सुट्या द्या यातून धर्मवाद सुद्धा निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या कंमेंट्स करूनही काहींनी विरोध व समर्थन दाखवले आहे.
विद्यार्थी संघटनांच्या म्हणण्यानुसार, बाहेरगावी असणारे मुलं मुली, नोकरी करणारे लोक गणेशोत्सवासाठी राज्यातील आपल्या गावी जात असतात. नेमक्या त्याच दरम्यान शाळेत परीक्षा असतात. शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते. परंतु, परत येताना अनेकांची गर्दी असते, वेळेवर पोहचल्या जात नाही. त्यामुळे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत. याबाबतचे निवेदनदेखील युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ देवरुखकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना दिले.
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात याव्या. अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गणेशोत्सवानंतर सुरू करा, या मागणीसाठी शिक्षक भारतीकडून शिक्षण संचालकांना पत्र पाठविले आहे. त्याचबरोबर अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला राउंड ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावा व बाकी राउंड गणेशोत्सवांनंतर घ्या, असे सुभाष मोरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Maratha Reservation: पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडेही बडवे आहेत, देशमुखांनी व्यक्त केला संताप
‘एकनाथराव..! बरं झालं तुम्ही माझ्यापासून दूर गेले, त्यामुळे…,’ उद्धव ठाकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
पक्षाकडून अपमान झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा, म्हणाला, राहुल गांधींकडे…
‘तुमचं भाषण ऐकल्यावर हाय क्वालिटी शिवीच आठवली’, त्या शिक्षकाच्या पत्नीनेही प्रशांत बंब यांना झापलं