मुली मुलींमधील हाणामारी आपण कित्येक वेळा व्हिडीओवरती किंवा प्रत्यक्ष पाहत असतो. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील आहे. माजलगाव शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवात आनंद मेळावा भरवला जातो. याचा आनंद घेण्यासाठी माजलगाव शहरातील अनेक नागरिक या आनंदनगरीमध्ये अनेक गोष्टी अनुभवण्यासाठी जातात.
शहरातील आनंदनगरीमध्ये अनेक कुटुंब, नागरिक आनंद घेण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी सहभागी होतात. या ठिकाणी अनेक तरुण-तरुणींचे ग्रुपही दिसून येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तिथे जात असतात.
मात्र, आज या ठिकाणी कॉलेज कुमारींमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला, तो वाद एवढा होता की त्यांच्यात थेट हाणामारी झाली. बघ्यांची गर्दी झाली. या हाणामारीचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत.
हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुणींच्या दोन ग्रुपमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचं रुपांतर हे थेट फ्री स्टाइल हाणामारीत झालं. या तरुणींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र कोणाचंच न ऐकता तरुणींनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली.
काही वेळानंतर त्यांना समजून सांगितल्यानंतरही त्या ऐकत नसल्याचा पाहून स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइल मध्ये कैद करायला सुरुवात केली. मुलींच्या दोन गटातील फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
अनेक जण आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक पेजवर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले. हे भांडण का झालं? हे मात्र अद्याप कोणालाही कळलेलं नाही. या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स आल्या. हाणामारी करताना मुलींना ना घरच्यांचं भान राहिलं ना स्वतःच्या संस्कृतीचं, ना स्वतःच्या इज्जतीचं भान राहिलं असे काहींनी म्हटलं आहे.