Share

बड्या पक्षाच्या आमदाराने स्वत:च्याच लग्नात लावली गैरहजेरी, संतापलेल्या नवरीने उचललं ‘हे’ धक्कदायक पाऊल

marrige

राजकीय नेते मंडळी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. हे सांगण्याच कारण म्हणजे, एका आमदारची एका वेगळ्याच कारणासाठी राज्यभरात चर्चा सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण वाचून तुम्हालाही देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण?

हे प्रकरण ओडिसामधील असल्याची माहिती मिळत आहे. ओडिसामधील बीजू जनता दल (बीजद)चे आमदार विजय शंकर दास (BJD MLA Bijaya Shankar Das) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आमदाराने केलेला कारनामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांच्या तर भुवया उंचवल्या आहेत.

नुकताच आमदार विजय शंकर दास यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल होण्यामागच कारणही तसच अजब आहे. आमदार विजय शंकर दास (BJD MLA Bijaya Shankar Das) हे आपल्याच लग्नाला पोहोचले नाहीत, त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी सदर महिला आणि आमदार दास यांनी विवाह नोंदणी कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला होता. ठरलेल्या वेळेनुसार, ती महिला सर्व तयारीत तिच्या परिवारासह निश्चित केलेल्या तारखेला लग्नासाठी विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचली.

मात्र आमदार विजय शंकर दास तिकडे फिरकलेच नाहीत. त्यानंतर विजय शंकर दास यांच्या विरोधात जगतसिंहपूर सदर पोलिस ठाण्यात सदर महिलेने तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आमदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महिलेनं तक्रार दाखल करताना दावा केला आहे की, आमचे गेल्या तीन वर्षांपासून संबंध आहेत. त्यांनी या तारखेला मला लग्नाचं वचन दिलं होतं. मात्र ते ठरलेल्या वेळेला आले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, मला आता त्यांच्या परिवारातील अन्य सदस्याकडून धमक्या येत आहेत.’

महत्वाच्या बातम्या :-
चला हवा येऊ द्या नंतर आता भारत गणेशपुरे, सागर कारंडे ‘या’ हिंदी शोमध्येही झळकणार, चाहते उत्सुक
रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे..! मुलाला धमकी आल्यावर वसंत मोरे खवळले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now