अजब प्रेमाच्या गजब कहाण्या तुम्ही वाचल्या असतीलच…! प्रेम हे आंधळ असतं.. केव्हा कोणावर कोणाचं प्रेम होईल काय सांगता येत नाही. अशीच एक अजब प्रेमाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्रेम कहाणीत चक्क गुरुजींना घेऊन विद्यार्थिनी फरार झाली आहे.
घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने या विद्यार्थिनीने अखेर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अजब प्रेम कहाणीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या तिनं लिहिलेलं पत्र आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तिने लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय…? ही अनोखी प्रेमकहाणी आहे बिहारच्या बेतियामधील. काजल कुमारी (१९ वर्षे) असे या प्रियसीचे नाव आहे. तर बंधू चौधरी असे प्रियकराचे नाव आहे. काजल बेतियाच्या नवलपूरची रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंधू चौधरी हे काजलचे शिक्षक होते.
आमचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजल व्हिडिओमधून सांगत आहे. सध्या तिचे एक पत्र आणि व्हिडिओ व्हायरल होतं आहे. घरच्यांचा विरोध असल्याने माझ्याकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असं काजलनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
वाचा काय म्हंटलं आहे काजलने व्हिडिओमध्ये… ‘मी त्यांच्याकडे कोचिंगला जायचे. तेव्हापासून आमच्यात बोलणं सुरू झालं. माझे आणि गुरुजींचे प्रेमसंबंध होते. मात्र माझ्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यांनी यावरून मला मारहाण केली,’ असा आरोप काजलनं व्हिडीओमध्ये कुटुंबियांवर केला आहे.
तसेच माझ्या कुटुंबीयांनी नवलपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार खोटी आहे, असं देखील तिने सांगितलं आहे. ‘मी माझ्या प्रियकराला म्हणजेच शिक्षक बंधू चौधरींना घेऊन पळाले आहे. आता मी जगेन तर बंधू चौधरींसोबत आणि मरेन तर बंधू चौधरींसोबत, असं तिने म्हंटले आहे.
दरम्यान, सध्या काजलचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजल काही दिवसांपूर्वी घरातून पळाली आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बंधू चौधरींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस या दोघांचा शोध घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: तरुणाने छेड काढल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वत:च केला शेअर; पोलिस म्हणाले…
…म्हणून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडताय; संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
युवराज सिंगची गर्लफ्रेंड करतेय ‘या’ खेळाडूशी दुसरं लग्न, नावं ऐकून हैराण व्हाल
‘तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये’, शत्रुघ्न सिन्हांवर आरोप करणाऱ्या महिलेवर भडकला ‘हा’ व्यक्ती