Share

PHOTO: ‘या’ दगडांमध्ये लपलेली आहे एक मुलगी, फक्त १३ सेकंदात शोधून दाखवा, भलेभले झालेत फेल

Optical illusions, netizens, puzzles, PHOTO, rock formations/ गेल्या काही महिन्यांत ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) लोकप्रियता खूप वाढली आहे आणि नेटिझन्सना ते सोडवायला आवडते असे दिसून येते. हे खरं तर खूप मनोरंजक आहे. ही चतुराईने तयार केलेली चित्रे (PHOTO) ज्या प्रकारे आपल्या मेंदूशी खेळतात ते खरोखरच रोमांचकारी आहे. ऑप्टिकल इल्युजन टेस्ट आपल्या मेंदूला फसवण्यासाठी आणि आपले निरीक्षण कौशल्याची शक्ती पडताळण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

केवळ नेटिझन्सच नाही तर शास्त्रज्ञही मानवी मेंदूवर ऑप्टिकल इल्युजनच्या प्रभावाचा अभ्यास करत आहेत आणि त्यानुसार मानवी मेंदूच्या कार्याचा अभ्यास करत आहेत. तुम्ही तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी करून घेऊ शकता. फोटो दडलेलं कोडं सोडवून तुम्ही तुमच आत्मपरीक्षण करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घ्यायची असेल, तर हे चित्र नक्की पहा, कारण या चित्रात तुम्हाला एक आव्हान देण्यात आले आहे. तसेच दिलेल्या वेळेतच कोडं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा फोटो तुम्हाला खडकाचे दृश्य दाखवतो. 13 सेकंदात तुम्हाला या रॉक फॉर्मेशन्समध्ये लपलेली मुलगी शोधावी लागेल.

हे एक आव्हान आहे आणि हे आव्हान वेळेत सोडवण्यासाठी तुम्हाला खरोखर या कठीण चित्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला यात लपलेली मुलगी सापडली आहे का? तुम्हाला थोडी मदत हवी असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, मुलीने जांभळ्या रंगाची कपडे घातली आहे. आता त्यामुळे तिची ओळख पटवणे सोपे होणार आहे.

चित्र काळजीपूर्वक पहा आणि वरील संकेताशी जुळणारे काही सापडते का ते पहा. उत्कृष्ट निरीक्षण कौशल्य असलेल्या लोकांनी आधीच मुलगी पाहिली असेल. जे अजूनही प्रयत्न करत आहेत त्यांना ते थोडे कष्टदायक वाटेल. तरीही, हे तुम्हाला तुमचे निरीक्षण कौशल्ये सुधारण्यास मदत करेल. तुमच्यापैकी किती जणांनी लपलेली मुलगी पाहिली आहे?

मेंदूचा व्यायाम करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मेंदूचा जितका जास्त व्यायाम केला जातो तितका तो तेज होतो कारण माणसाला जेवढ विचार करायला भाग पाडले जाते तेवढा मेंदू काम करू लागतो. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची कोडी (ऑप्टिकल इल्युजन) सोडवीत राहायला हवी.

महत्वाच्या बातम्या-
Optical Illusions: या फोटोत सर्वात आधी तुम्हाला काय दिसतंय? चेहरा की उंदीर? यावरून ठरतो तुमचा स्वभाव, वाचा..
Optical Illusions: फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधला तर तुम्ही ‘जिनीअस’, ९९% लोकं झालेत फेल, डोकं चक्रावून जाईल
ऑप्टिकल इल्युजनने अनेकांची केली बत्तीगुल, आता तुम्हीच सांगा या फोटोत नक्की किती घोडे?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now