Nawazuddin Siddiqui, Haddi, First Look/ नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) गणना बॉलिवूडमधील सर्वात अष्टपैलू कलाकारांमध्ये केली जाते. अलीकडेच त्याच्या ‘हड्डी’ (Haddi) या रिव्हेंज ड्रामामधला त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कोणालाही या अभिनेत्याला ओळखणे कठीण झाले होते. हड्डीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात तो एका महिलेच्या आणि ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा महिला गेटअप सतत चर्चेत असतो. फोटो पाहून तो नवाजुद्दीन आहे हे ओळखणे कठीण आहे. मात्र यासाठी नवाजुद्दीनला खूप कष्ट घ्यावे लागले. या लूकसाठी अभिनेत्याचा मेकअप अनेक तास सुरू असायचा. ज्याबद्दल अभिनेता आता काय बोलला आहे ते जाणून घ्या.
नवाजुद्दीन सिद्दीकी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याच्या फिमेल लूकबद्दल म्हणाला की, आम्ही नुकतेच ‘हड्डी’चे शूटिंग सुरू केले. हा एक रिव्हेंज ड्रामा आहे, ज्यामध्ये मी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मी एका स्त्री आणि ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. दोन्ही वेगवेगळे भाग आहेत, म्हणजे मी दुहेरी भूमिकेत आहे. अक्षत शर्माला गेल्या 4 वर्षांपासून हा चित्रपट बनवायचा होता. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखतो आणि आता आम्ही एकत्र काम करत आहोत.
अर्चना पूरण सिंगसोबत त्याच्या लूकची तुलना करताना नवाजुद्दीन पुढे म्हणतो, जर मी स्त्रीची भूमिका साकारत असेल, तर मला असाच विचार करावा लागेल आणि एक अभिनेता म्हणून हीच माझी परीक्षा आहे. हा लूक कोणाकडूनही प्रेरणा घेतलेला नाही. आउटफिट, मेकअप, या सगळ्याची मला चिंता नाही. हे सर्व पाहण्यासाठी तज्ञ आहेत.
तज्ञ बाह्य गोष्टींची काळजी घेतील. स्त्रिया कसे विचार करतात, त्यांना काय हवे आहे यावर माझे लक्ष होते. कारण, अभिनेत्याचे काम हे त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये उतरणे असते. कारण, जीवनाकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. मी हड्डीमध्ये एका स्त्रीची भूमिका करत आहे, त्यामुळे मला जगाकडे स्त्रीच्या दृष्टिकोनातून पहावे लागेल. या व्यक्तिरेखेसाठी दररोज सुमारे 3 तासांचा मेकअप करावा लागतो.
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, जेव्हा माझ्या मुलीने मला या मुलीच्या लूकमध्ये पाहिले तेव्हा तिला खूप राग आला. पण, आता तिला माहित आहे की हे सर्व केवळ भूमिकेसाठी आहे. या अनुभवावर मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की, हे सर्व रोजच्या रोज करणाऱ्या सर्व अभिनेत्रींबद्दल मला मनापासून आदर आहे. केस, मेकअप, कपडे पूर्ण संस्कार घेऊन पुढे जावे लागते. अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना वैनिटीमधून बाहेर येण्यासाठी जास्त वेळ का लागतो हे आता कळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
heropanti 2 review: डान्स आणि ऍक्शनने वेड लावतोय टायगर, नवाजुद्दीनचे कॉम्बिनेशन आहे हिट
गावातील मुलीवर फिदा झाला होता नवाजुद्दीन, पण टीव्हीने घातला घोटाळा; वाचा स्वतःच सांगितलेला किस्सा
नवाजुद्दीन सिद्दीकीला बदलायचंय बॉलिवूडचं नाव, म्हणाला, मला या तीन गोष्टी मुळीच आवडत नाहीत
या गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात