Share

लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्…, वाचून बसेल धक्का

crime news

जन्म – मृत्यू आपल्या हातात नसतं असं म्हणतात. ते अगदी खरं जन्म – मृत्यू म्हणजे नियतीचा खेळ. कुटुंबातील सदस्य आपल्यातून निघून गेला की, आपल्याला त्याची किंमत समजते. प्रत्येकाला वाटतं आपली व्यक्ति पुन्हा आपल्यात यावी. मात्र नियतीचा खेळच असा की एकदा मृत पावलेली व्यक्ती आपल्यात येत नाही. 

प्रत्येकाला वाटतं की, देवाच्या कृपेने काही तरी चमत्कार व्हावा. हे सांगण्याच कारण म्हणजे, अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली. हा संपूर्ण प्रकार पाहून तुम्हाला जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

वाचा नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेक्सिकोमध्ये घडली असल्याची माहिती हाती आली आहे. मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आहे. या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. याचबरोबर सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

सॅन लुइस पोटोसील राहणारी 3 वर्षांची कॅमिलिया रोक्साना, हिच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मात्र असं असलं तरी देखील, आपल्या मुलीचा मृत्यू झाला, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. 

माझी मुलगी जिवंत आहे, तिचा मृत्यू झाला नाही, असं ती सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती. मात्र तिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. अखेर मुलीवर अंत्यसंस्काराची वेळ आली. आईचे लक्ष शवपेटीकडे होतं. विशेष बाब म्हणजे, अचानक तिला शवपेटी हलताना दिसली. 

दरम्यान, शवपेटीतून काही वेळाने आवाज येऊ लागला. डॉक्टरांनी मृत घोषित केलेली मुलगी आतमध्ये रडत होती आणि आपल्या आईला आवाज देत होती. तेव्हा शवपेटी उघडली. अन् तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच जबर धक्का बसला. मुलगी चक्क जिवंत होती. 

महत्त्वाच्या बातम्या
इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now