भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. ते कसब्याच्या आमदार होत्या. त्यांच्या निधनानंतर कबस्यात पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. या निवडणूकीमध्ये मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लावण्यात आलेल्या पोटनिवडणूकीमध्ये टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल असे म्हटले जात होते. पण मतदार संघातील मतांचे गणित बघता हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरी कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्यामुळे त्याचा फटका भाजपला बसू शकतो असे म्हटले जात आहे.
आता पुण्याची ताकद असलेला हुकुमी एक्का भाजपने मैदानात उतरवला आहे. खासदार गिरीष बापट हे आजारी असताना मैदानात उतरले आहे. त्यांनी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. व्हिलचेअरवर असतानाही ते या निवडणूकीच्या प्रचारासाठी आले आहे.
प्रचारावेळी गिरीष बापट यांच्या नाकात नळी आणि बाजूला ऑक्सिजन सिलेंडर असे होते. त्यांनी व्हिलचेअरवर असतानाही ते प्रचारासाठी आलेले दिसले. गेल्या काही दिवसांपासून गिरीष बापट खुप आजारी आहे. त्यामुळे ते कसबा निवडणूकीच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. पण आता ते मैदानात उतरले आहे.
प्रचारादरम्यान त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेले ३ महिने प्रकृती अस्वस्थ आहे. त्यामुळे मी खुप कमी काम केले असून मला सुद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी मतदार संघात फिरुन प्रचार करु शकणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर गिरीष बापट यांनी निवडणूकीच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला कसबा विधानसभा पोट निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरीष बापट आता स्वत: मैदानात उतरले आहे. गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात गिरीष बापट यांची एक हाती सत्ता आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ दोन प्रश्न विचारत सुप्रीम कोर्टाने वाढवलं शिंदे गटाचं टेंशन, संपुर्ण प्रकरणाचा रोखच टाकला बदलून
सरन्यायाधीश म्हणाले ‘शिंदेगट बुद्धीबळासारखा खेळला’; सिब्बल म्हणाले तुमच्या पाया पडतो पण…
आनंदाची बातमी! आता फुकट पाहता येणार २०० चॅनेल्स; सेट टॉप बॉक्सचीही गरज नाही