Share

पगार घेण्यासाठी गेली होती शाळेत, दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि.., काश्मिर फाईल्सनंतर गिरीजा टिक्कूची कहाणी चर्चेत

‘द कश्मीर फाइल्स’ (Kashmir Files) या चित्रपटाची सध्या देशभर चर्चा होत आहे. काश्मिरी हिंदूंचे निर्गमन आणि हत्याकांड या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांबाबत यापूर्वीही चर्चा झाल्या होत्या, पण या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच चित्रपट बनला असून त्याची चर्चा होत आहे. काश्मिरी हिंदूंच्या निर्गमन आणि बरबादीच्या अशा कहाण्या दाखवल्या आहेत की ज्या पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.(Girija Tikku’s story discussed after Kashmir files)

या चित्रपटात गिरिजा टिकूची कथाही दाखवण्यात आली आहे. 2019 मध्ये, अमेरिकेमध्ये, काश्मिरी वंशाच्या लेखिका सुनंदा वशिष्ठ यांनीही गिरिजा टिक्कूचा उल्लेख केला होता. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गिरीजा कुमारी टिक्कूची कथा, जी ऐकून तुमचा संताप होईल आणि तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

11 जून 1990 चा दिवस जेव्हा गिरिजा कुमारी टिक्कू पगार घेण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. ती शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करायची. शाळा बांदीपोरा जिल्ह्यात होती आणि पगार मिळाल्यानंतर ती त्याच दिवशी ज्या गावात शाळा होती त्याच गावातील एका सहकाऱ्याच्या घरी भेटायला गेली. दरम्यान, दहशतवाद्यांची तिच्यावर नजर होती, ती त्या घरात पोहोचताच तिचे अपहरण करण्यात आले. याची माहिती गावकऱ्यांना मिळाली मात्र दहशतवाद्यांच्या भीतीने कोणीही पुढे सरकले नाही.

त्यानंतर गिरिजा कुमारीचं काय झालं हे ऐकून तुम्हालाही रडू येईल. दहशतवाद्यांनी केवळ अपहरणच केले नाही तर सामूहिक बलात्कारही केला. एवढ्यानेही त्या दारिद्यांचे मन भरले नाही, त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक करवतीच्या साहायाने गिरीजाला जिवंत कापले. यातून दहशतवाद्यांना अनेक संदेश द्यायचे होते आणि काश्मिरी हिंदूंमध्ये भीती निर्माण करायची होती.

गिरिजा टिक्कू यांनी आपली वृद्ध आई, पती आणि दोन लहान मुले मागे सोडली. बऱ्याच दिवसांनी विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटात या वेदनांचे वर्णन करण्यात आले आहे. गिरिजा टिक्कूचे कुटुंब अमेरिकेत आहे. अनेक वर्षे याबद्दल कोणीच काही बोलले नाही पण चित्रपट पाहून गिरिजा टिक्कूचे संपूर्ण कुटुंब रडले. हा चित्रपट पाहिल्यानंतर गिरिजा देवीच्या भाचीने एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, तिचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

अमेरिकेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी वंशाच्या लेखिका सुनंदा वशिष्ठ यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती राज्यातून कलम 370 रद्द करण्याचे समर्थन करते आणि म्हणते की माझे पालक काश्मिरी पंडित आहेत, मी हिंदू काश्मिरी पंडित आहे. आम्ही काश्मीरमधील पीडित समाजातून आलो आहोत ज्यांना इस्लामिक कट्टरतावादामुळे घरे सोडावी लागली. हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून टाकण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिंसाचारामुळे आम्हाला जबरदस्तीने आणि भयभीत होऊन आमची घरे सोडावी लागली.

त्या काळातील भीषण हिंसाचाराचे स्मरण करून सुनंदा म्हणाल्या की, आमची घरे जाळण्यात आली, बागा पेटवण्यात आल्या. धार्मिक अस्मितेच्या आधारावर लक्ष्य केले. गिरिजा टिक्कूसारख्या महिलांवर दहशतवाद्यांनी सामूहिक बलात्कार केला, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. सुनंदा वशिष्ठ यांचा 2019 चा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
द काश्मीर फाईल्स चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली एवढ्या कोटींची कमाई
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले असे उत्तर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now