मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट, डिजिटल अशा अनेक माध्यमातून गिरीजाने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना गिरीजाने तिच्या पहिल्या किसदरम्यानच्या अनुभवाबाबत मोठा खुलासा केला आहे.
गिरीजाने नुकतीच मिर्ची मराठीला मुलाखत दिली. यावेळी तुझ्या पहिल्या किसचा अनुभव कसा होता? असा बोल्ड प्रश्न गिरीजाला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गिरीजाने सांगितले की, ‘माझ्या पहिल्या किसबद्दल मला फारसं काही आठवत नाही. पण पहिल्या किसमुळे मला अजिबात चांगलं वाटलं नाही, एवढं मात्र मी नक्की सांगू शकते. पहिला किस ही संकल्पनाच मला ओव्हररेटेड असल्यासारखी वाटते. कदाचित पहिल्या किसच्यावेळी मी खूपच लहान होते. अगदी कॉलेजमध्ये होते. त्यामुळे मला तसं वाटलं असावं’.
गिरीजाने पुढे सांगितले की, ‘मला एक गोष्ट नंतर जाणवली की, माझा पहिल्या किसचा अनुभव फार वेगळा आणि अविस्मरणीय असू शकला असता. पहिल्या किसच्या वेळी पाऊस पडणं किंवा आम्ही दोघे जवळ येणं असं फार काही रोमँटिक घडलं नाही. त्यामुळे मला तसं वाटलं असावं’, असे तिने यावेळी बोलताना म्हटले.
गिरीजा ओक ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. तिला अभिनयाचा वारसा तिच्या घरातूनच मिळाला. वयाच्या १५ व्या वर्षापासून तिने अभिनय करण्यास सुरुवात केली. रंगभूमीसोबत तिने मराठी आणि हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
गिरीजाने ‘लज्जा’ या मराठी मालिकेत तर ‘लेडिज स्पेशल’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरही काम करत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आमिर खानसोबत ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातही ती दिसली होती.
रंगभूमी, मालिका, चित्रपट यानंतर गिरीजाने डिजिटल माध्यमातही पदार्पण केले. ती आल्ट बालाजीच्या ‘कार्टेल’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. गिरीजा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप पसंती मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
नागराज मंजुळे रॉक्स! दुसऱ्या दिवशीही ‘झुंड’ने विक्रमी कमाई करत गाठला नवीन टप्पा, कमावले ‘एवढे’ कोटी
मिथुन चक्रवर्तींसोबत बोल्ड सिन देताना हेमा मालिनींसोबत घडला होता ‘हा’ प्रकार, दीर्घकाळ धरला होता अबोला
आमिरने समजूत काढल्यानंतर बिग बी झुंड चित्रपटात काम करण्यास झाले तयार, वाचा किस्सा