टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने हैदराबादमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. गिलने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. उजव्या हाताच्या फलंदाजाने षटकार ठोकत ही कामगिरी केली.
शुभमन गिलने २०२२ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा गिल हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ईशान किशन यांनी हा पराक्रम केला आहे.
शुभमन गिलने 149 चेंडूत वेगवान फलंदाजी करताना 9 षटकार आणि 19 चौकार मारले. या दमदार खेळीदरम्यान, पंजाबचा युवा सलामीवीर भारतासाठी वनडेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला. या प्रकरणात त्याने स्टार खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले.
बुधवारी हैदराबादमध्ये झंझावाती खेळी करताना शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण केल्या. २३ वर्षीय शुभमन गिलने अवघ्या १९व्या डावात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावात हजार धावा करणारा गिल आता संयुक्तपणे जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही मागे टाकले आहे. बाबर आझमने 21 डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर आहे. फखर जमानने 18 डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
गिल आता सर्वात जलद हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात गिलने विराट कोहलीला मागे टाकले. विराट कोहलीने 24 डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या १९ डावातील शुभमन गिलचे हे तिसरे शतक होते. भारतीय खेळाडूंमध्ये, फक्त शिखर धवनने (17) गिलपेक्षा कमी डावात तिसरे वनडे शतक पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या
हिरे व्यापाऱ्याच्या 8 वर्षांच्या लेकीने घेतला संन्यास, करोडोंची संपत्ती आणि आलिशान जीवनाचा केला त्याग
उत्सूकता शिगेला! ‘या’ तारखेला येतोय ‘बाळासाहेबांचा राज’; जाणून घ्या सविस्तर…
नवऱ्यापासून घटस्फोट घेताच महीलेने केले कुत्र्यासोबत लग्न; म्हणाली जे प्रेम नवऱ्याने दिले नाही ते कुत्रा देतो