Share

लग्नात वधूला मिळाले असे गिफ्ट की पाहून सगळेच झाले अवाक, व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. लग्न म्हटले की नवीन वर- वधुला अनेकांकडून गिफ्ट मिळते. अनेक जवळचे नातेवाईक आणि मित्र- परिवार आपल्या पद्धतीने नवरा- नवरीला काहीतरी गिफ्ट देतात, आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. अशाच एका लग्नात नवीन वर-वधूला एक अजबच गिफ्ट मिळाले आहे, सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नात वर-वधूचे मित्र भेटवस्तूच्या नावाखाली त्यांच्याशी खूप चेष्टा करतात. काही भेटवस्तू अशी असते की ती पाहून सगळ्यांनाच हसू येते. अशाच बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हांला देखील हसणे थांबवणार नाही याची खात्री आहे.

लग्नाच्या या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. मग वधू त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा बॉक्स उघडते. या भेटवस्तूचे पॅकिंग फार मजबूत असते. सर्वांना त्या बॉक्समध्ये काय असेल याची उत्सुकता असते. मात्र, जेव्हा वधू तो बॉक्स उघडते तेव्हा ती आश्चर्यचकित होते. त्यानंतर तुम्हांला देखील बॉक्सच्या आत जे पाहायला मिळाले त्यावर विश्वास बसणार नाही.

वधूने भेटवस्तू उघडताच तिला आश्चर्य वाटले, कारण एका बॉक्समध्ये आणखी एक बॉक्स होता. यानंतर त्या बॉक्समध्ये एक पॅकेट होते, ते उघडल्यावर त्याला दुसरे पॅकेट दिसले. अशा प्रकारे तिने अनेकवेळा पॅकेट उघडले. त्यानंतर खुप वेळा गिफ्ट रॅपर उघडल्यानंतर अखेर नववधूच्या हाती गिफ्ट लागले. जे पाहून सगळ्यांना आपलं हसू आवरलं नाही.

शेवटी जेव्हा नववधू पॅकेट उघडले तेव्हा ती विचारात पडली. कारण तिला पॅकेटमध्ये मास्क मिळाला. हे गिफ्ट पाहून नववधू सोबतच स्टेजवर उपस्थीत सगळ्याच लोकांना खुप हसायला आलं. कारण एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये फक्त 2 मास्क होते, हे फारच आश्चर्यकारक होते. सर्वांना गिफ्ट पाहून हासू आवरेना.

https://www.instagram.com/reel/CZbypF6uiIp/?utm_source=ig_web_copy_link

हे गिफ्ट नवीन वर-वधू यांच्या मित्रांनी दिले होते. हे गिफ्ट देण्यामागे त्यांच्या मित्रांचा एकच हेतू होता की, कोरोनाच्या काळात लग्नाच्या वेळीही मास्क घालावा. हा व्हिडिओ घंटा नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ लोकांना देखील प्रचंड आवडला असून, तो सध्या व्हायरल होत आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now