गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जुने आणि जाणते जेष्ठ नेते आज काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत. यामुळे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही कारणांवरून वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, या मंगळवारीच काँग्रेसने मोठा निर्णय घेत गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक समित्यांचे प्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने आझाद यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज होते. यामुळेच त्यांनी प्रचार आणि राजकीय समिती या दोन्ही पदांचा राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
आझाद यांच्या राजीनाम्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येच नाही तर पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षनेतृत्वावर सवाल उपस्थित केले आहेत. राहुल यांनी पक्षात आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्यही ठेवलं नाही. आता पक्षात केवळ नव्या अध्यक्षाच्या निवडीचा खेळ खेळला जातोय, असं आझाद यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आता काँग्रेसमध्ये आणखी काही राजीनामे पडणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू असताना गुलाम नबी आझाद यांनी दिलेला हा राजीनामा पक्षासाठी धक्का देणारा आहे.
महत्त्वाच्या बातम्या






