Share

काॅंग्रेसला आजवरचे सर्वात मोठे भगदाड; उपमुख्यमंत्र्यासह तब्बल ५१ बडे नेते राजीनामा देणार

नुकताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याच बोललं जातं आहे.

मंगळवारीच काँग्रेसने मोठा निर्णय घेत गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक समित्यांचे प्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने आझाद यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज होते. यामुळेच त्यांनी प्रचार आणि राजकीय समिती या दोन्ही पदांचा राजीनामा दिला.

मात्र आता कॉंग्रेसला चांगलीच गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ५१ मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत, हे नेते रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दाखल होणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा हे देखील पक्षाला रामराम ठोकणार आहेत.

दरम्यान, आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक बडे नेते त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे देत असल्याच पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे सध्या कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे आझाद यांच्या राजीनाम्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येच नाही तर कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. राजीनामा देताना गुलाम नबी आझाद यांनी पक्षनेतृत्वावर सवाल उपस्थित केले. राहुल यांनी पक्षात आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्यही ठेवलं नाही. आता पक्षात केवळ नव्या अध्यक्षाच्या निवडीचा खेळ खेळला जातोय, असं आझाद यांनी म्हंटलं.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आता काँग्रेसमधील आणखी किती नेते राजीनामे देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. सध्या काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच पक्षाला लागलेली गळती चर्चेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now