काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांनी निदर्शनं केली आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
आज दिवसभरात राज्यात आंदोलन केली आहे. पण आता ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसही आक्रमक झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दाखल केली असून तातडीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असंही या तक्रारीत म्हटलं आहे. महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोलेयांच्या साठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील भाजपा युवा मोर्चाने उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुंबई प्रदेश भाजपाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. पटोले यांच्यावर कारवाई करण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पटोलेंच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसात जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्याविरोधात बोलल्यावर शांत झोप लागली का गं? स्वामी समर्थांना तु काय कारण सांगीतलंस”
नाना पटोलेंना अटक करा अन्यथा उपोषणाला बसणार; भाजप नेत्यांची राज्यपालांकडे धाव
पाटील विरूद्ध पटोले! माझ्या विरोधात जायचं तिकडं जा, आम्ही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार
नाना पटोलेंना अटक करा अन्यथा उपोषणाला बसणार; भाजप नेत्यांची राज्यपालांकडे धाव