Share

मातीत उगवलं सोनं! फक्त दहा गुंठ्यात जरबेराची शेती करून कमावतोय लाखो रुपये, दिवसाची कमाई वाचून अवाक व्हाल

gerbera

अलीकडे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जरबेराची शेती करून या शेतकऱ्याला लाखोंच उत्पादन मिळाले आहे.

अनेकदा आपला नकारात्मक गैरसमज होतो की, शेतीतून परवडत नाही, हवं तसं उत्पादन मिळत नाही मात्र आपण जर नवीन प्रयोग केला तरी नक्कीच शेतीतून चांगला फायदा मिळू शकतो. याचे जीवंत उदाहरण आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जरबेराच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळाले असून बाजार पेठेत चांगला भाव मिळाल्याने फायदा देखील जास्त झाला आहे. तुम्हीही हा प्रयोग तुमच्या शेतात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर… पंकज अडकिने हे हिंगोली शहरातील डोंगरकडा गावातील शेतकरी आहेत.

पंकज अडकिने हे काही दिवसांपूर्वी पुणे इथे प्रशिक्षणासाठी गेले असता तिथे फूल शेती त्यांच्या निदर्शनास आली. ते पाहून त्यांनीही शेतात फुलांचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना याबाबत कल्पना नव्हती मात्र पीक घ्यायचा निर्णय झाल्यावर त्यांनी याचं संपूर्ण प्रशिक्षण पुणे इथे घेतलं.

पंकज यांनी यासाठी दहा गुंठे जमिनीवर पॉलिहाऊस तयार केले. या पॉलिहाऊसमध्ये तीन तीन फुटाचे असे बेड तयार करण्यात आले. या मातीवर अडकिने यांनी जरबेरा या फुलांच्या रोपट्यांची लागवड केली. एकंदरीत लावगडीसाठी त्यांना दोन लाख रुपये इतका खर्च आला.

दरम्यान, याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज ही फुलं नांदेड आणि हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. त्यामधून त्यांना दररोज तीन ते चार हजार रुपये मिळतात. या जरबेराच्या प्रत्येकी एका फुलाला दहा रुपये ते वीस रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. ते जरबेराच्या शेतीमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘सेना आणि भाजपला एकत्र आणणे फक्त गडकरींच्या हातात’, शिवसेना आमदाराने व्यक्त केली इच्छा
संभाजीराजेंच्या उपोषणाला व्हॅनिटी कार कशासाठी? खासदारकी संपतेय म्हणून आंदोलन; सदावर्तेंची तुफान टिका
VIDEO: मलायका अरोराच्या एका किसने कागदावरचा मासा झाला जिवंत, अशी जादू तुम्ही कुठेही पाहिली नसेल
‘भारत माता की जय’ म्हणताच आलेला जोश मोदीजी जिंदाबाद म्हणताच उतरला, व्हिडीओ व्हायरल

इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now