माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देत देशमुखांची सून अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने विलासरावांच्या फोटोला पकडून बसलेल्या आपल्या दोन मुलांचा फोटो शेअर केला आहे. (Genelia got emotional on the question of the girls and said..)
जेनेलियाच्या दोन मुलांनी तिला विचारले होते की, आम्ही जर आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का? यावर त्यांना जेनेलियाने दिलेले उत्तर तिच्या पोस्टमध्ये आहे. तसेच रियान व राहिल या दोन लहान मुलांचा विलासरावांची फोटोफ्रेम पकडून एक फोटो आहे. जो जेनेलियाने पोस्टमध्ये शेअर केला.
जेनेलिया पोस्टमध्ये लिहिते की, ‘प्रिय पप्पा.. आज मला रियान आणि राहिलने विचारलं की, आई.. आम्ही जर आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का? यावर मी निसंकोचपणे म्हटलं, ते तुम्हाला ऐकू शकत असतील तर नक्कीच उत्तर देतील.’
पुढे जेनेलिया लिहिते की, ‘मी इतकी वर्ष प्रामाणिकपणे तुमची उत्तर ऐकत जगली आहे. मला माहित आहे. आमच्या कठीण काळात सुद्धा तुम्ही आमच्यासोबत होता. आणि आमच्या आनंदाच्या क्षणी सुद्धा तुम्ही हसला होता.’
‘मला माहित आहे. तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता. आणि हे सुद्धा मला माहित आहे की, आता जे मी लिहिते आहे ते पण तुम्ही वाचत आहात. तुम्ही सदैव आमच्यासोबत आहात.’
‘आम्ही तुम्हाला ऐकू शकू, तुम्हाला पाहू शकू, तुम्हाला मनाने अनुभवू शकू, हे वचन तुम्ही आम्हाला दिलंय. आम्हाला तुमची खुप आठवण येते पप्पा.., रियान आणि राहिल यांनी तुमचा फोटो पकडण्यासाठी आग्रह केला,’ अशा शब्दात जेनेलियाने विलासरावांना भावुक पत्रच लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्वातंत्र्य दिनादिवशी होणार होता मोठा घातपात, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या दहशतवाद्यांच्या मुसक्या
शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर; फडणवीसांनी महत्वाची खाती घेत दिला शिंदे गटाला धक्का
हर घर तिरंगा अभियान वादाच्या भोवऱ्यात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार ‘एवढे’ रुपये