बॉलिवूडची चुलबुली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जेनेलिया डिसूजा (Genelia D’souza). जेनेलिया दीर्घकाळापासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले. पण आता दीर्घकाळानंतर जेनेलिया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी ती पती रितेश देशमुखसोबत ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पुनरागमन करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता लवकरच जेनेलिया बॉलिवूडमध्येही पुनरागमन करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, जेनेलिया लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसद्वारा निर्मित ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटात जेनेलियाने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती आमिर खानचा भाचा इम्रान खानसोबत दिसली होती. तर चित्रपटातील तिचा अभिनय पाहून आमिर खान खूपच इंम्प्रेस झाला होता.
तर आता याच चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये आमिर जेनेलियाला पुन्हा एकदा कास्ट करू इच्छित आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दोघांची बोलणेसुद्धा झाले होते. आणि जेनेलियानेसुद्धा हा चित्रपट करण्यास तयार झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. जर हे वृत्त खरे असल्यास जेनेलिया दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती पती रितेश देशमुखसोबत दिसली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे २०१२ साली विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटात काम करणे बंद केले होते.
तर दीर्घकाळानंतर लवकरच ते दोघे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे रितेश देशमुख पहिल्यांदाच दिग्दर्शत क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तर जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तसेच दोघांनी फेब्रुवारीमध्ये ‘मिस्टर मम्मी’ नावाच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली होती. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय जेनेलिया नुकतीच काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही पुनरागमन करणार असल्याचे सांगितले होते. एकंदरित जेनेलिया आता दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रोफेशनल लाईफसाठी वेळ देऊ इच्छित असल्याचे याद्वारे लक्षात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली, ‘ते माझ्यासाठी खास होते’
17 वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याच्या हट्टापायी ज्युनियर NTR वर झाला होता गुन्हा दाखल, वाचा किस्सा
चाहत्यांना धक्का! विशाखा सुभेदारने हास्यजत्रेला ठोकला रामराम, म्हणाली, ‘असले घाणेरडे आरोप करू नका’