बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi)अल्पावधीतच सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्याचा गेहराइयां हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता सिद्धांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माध्यमात चर्चेत आहे. नुकतीच एका मुलाखतीत बोलताना सिद्धांतने त्याच्या रिलेशनशीवर भाष्य केला आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिद्धांतने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत बोलला आहे. सिद्धांत एका मुलीसोबत ४ वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. आणि त्या मुलीसोबतच तो सेटल होऊ इच्छित होता. पण नंतर असे काही झाले ज्यामुळे त्याचे आयुष्यच बदलले. त्याने पाहिलेल्या स्वप्नासाठी त्याचे ब्रेकअप झाले.
यासंदर्भात सांगताना सिद्धांतने म्हटले की, ‘जेव्हा मी २० वर्षाचा होतो तेव्हा मला माहित होतं की, आयुष्यात मला काय करायचे आहे. पण याच कारणामुळे माझे ४ वर्षाचे नाते तुटले. मी तिच्यासोबत सेटल होऊ इच्छित होतो. पण तिला साधे जीवन जगायचे होते’.
https://www.instagram.com/p/CZjh5ekL2yM/
सिद्धांतने पुढे सांगितले की, ‘त्यावेळी मी सीए करत होतो आणि तेव्हा मी माझा करिअर बदलण्याचा निर्णय घेतला होता. पण ही गोष्ट तिला आवडली नाही. आम्ही दोघेही जीवनात वेगवेगळे स्वप्न पाहत होतो. पण मला माझे प्रेम किंवा स्वप्न यापैकी एक निवडायचे होते. तेव्हा मी मनावर दगड ठेऊन माझ्या स्वप्नांना प्राधान्य दिले’.
‘मला आठवतंय की, मी तिला म्हटलं होतं की, मी स्टेजवर परफॉर्म करू इच्छित आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि आज मी याठिकाणी आहे’. दरम्यान, ‘गली बॉय’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटानंतर ‘गेहराइयां’ हा सिद्धांतचा तिसरा चित्रपट आहे. ‘गहराइयां’ चित्रपटामुळे सध्या तो फारच चर्चेत आहे.
याशिवाय लवकरच सिद्धांत कतरिना कैफ आणि इशान खट्टरसोबत ‘फोन बूथ’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याशिवाय तो ‘खो गए हम कहाँ?’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
दादूस झाला शेठमाणूस; विनायक माळीने खरेदी केली ‘एवढ्या’ लाखांची मर्सिडीज; म्हणाला, ‘घेतली एकदाची’
Varsha Usgaonkar Birthday: वर्षा उसगांवकरने एकदा केलं होतं टॉपलेस फोटोशूट, झाली होती प्रचंड टीका
६०० एपिसोडपर्यंत शिव्यांचा अक्षरशः वर्षाव झाला; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत