Share

‘या’ व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती गीता माँ, फोटो झाले होते व्हायरल, नाव वाचून अवाक व्हाल

गीता कपूर (Geeta Kapoor) ही बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. मुलांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या गीता कपूर हिला गीता माँ या नावानेही ओळखले जाते. गीता कपूरला आ कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल हो ना हो, मैं हूं ना ज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॅकग्राउंड डान्सरपासून ती आज एक प्रसिद्ध कोरिओग्राफर बनली आहे. तिच्या हावभावावर संपूर्ण बॉलीवूड नाचतो.(Geeta Kapoor, Background Dancer, Choreographer, Farah Khan)

वयाच्या १५ व्या वर्षी फराह खानची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून करिअरची सुरुवात करणारी गीता आज तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार  आहोत. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानच्या डान्स ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर गीता कपूरने ‘तुझे याद ना मेरी आई’, ‘गोरी गोरी’ सारख्या गाण्यांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केले.

गीता कपूर

यानंतर ती फराह खानला असिस्ट करू लागली. गीताने फराहला कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल हो ना हो, मैं हूं ना आणि ओम शांती ओम या चित्रपटांमध्ये असिस्ट केले आहे. यानंतर ती स्वत: कोरिओग्राफर बनली आणि तिने फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, अलादीन, तीस मार खान, शीला की जवानी यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमध्ये कोरिओग्राफ करून लोकप्रियता मिळवली.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने अजून लग्न केलेले नाही. फार पूर्वी ती तिच्याच अफेअरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. गीता कपूरचे राजीव खिचीसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. दोघांचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. बर्‍याच प्रसंगी दोघे एकत्र दिसले आणि ते एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे.

गीता कपूर

जेव्हा त्यांच्या नात्याच्या बातम्यांनी वेग घेतला तेव्हा राजीवने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, तो आणि गीता फक्त चांगले मित्र आहेत. गीताच्या हृदयात राजीवसाठी विशेष स्थान असल्याचे आजही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी गीता कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तिने आपल्या भांगात सिंदूर लावला होता. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आली होती. त्या काळातही तिने राजीवसोबत गुपचूप लग्न केल्याचे आणि हे सिंदूर त्याच्या नावावर असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर जेव्हा सत्य बाहेर आले आणि ते उघड झाले तेव्हा कळले की तिने फक्त शूटसाठी सिंदूर लावला होता.

महत्वाच्या बातम्या-
एक-दोन नव्हे तर सहा अभिनेत्रींसाठी धडधडत होते शम्मी कपूरचे हृदय; मुलगा आदित्यने उघडली अनेक गुपिते
त्यामुळे माझ्या वडिलांनी नाईलाजाने दुसरं लग्न केलं होतं; शम्मी कपूर यांच्या मुलाचा मोठा खुलासा
कपूर फॅमिलीने केलाय हा वर्ल्ड रेकॉर्ड, आलियाच्या सासऱ्यांचा बॉलिवूडमध्ये होता जबरदस्त दबदबा
लतादीदींच्या निधनानंतर बाॅलिवूड शोकसागरात; अनिल कपूर म्हणाले काळीज तुटलं..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now