Share

गावसकरांनी सांगितला अशोक सराफांच्या अर्ध्या चड्डीचा मजेशीर किस्सा; वाचून पोट धरून हसाल

मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांचे काही मजेशीर किस्से सांगितले आहेत.

विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांची ओळख आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटक क्षेत्रात काम केले आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत.

दरम्यान, अशोक शराफ यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम झाला, यावेळी सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांच्या संदर्भातील काही किस्से सांगितले. सुनील गावस्कर म्हणाले, आम्ही लहान असताना अशोकला शाळेत जाताना पाहायचो. तेव्हा आम्ही विचार करायचो की अशोक हा वेळेच्या पुढचा विचार करणारा आहे.

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, मी असे म्हणत आहे कारण, १९६० च्या दरम्यान अशोक अर्धी चड्डी घालत होता, जे कोणी त्यावेळी घालत नव्हतं. पण एक २० वर्षानंतर १९८० मध्ये पीट सॅम्प्रस या टेनिस प्लेअरने अर्धी चड्डी अगदी फेमस केली. खरे तर ही फॅशन अशोक सराफने आणली होती, असे सुनील गावस्कर म्हणाले.

सुनील गावस्कर आणि अशोक सराफ यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान दिले हे सर्वांना परिचयाचे आहेच. परंतु क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवून आणण्याअगोदर अगदी लहानवयात त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत नाटकांतून काम केले आहे.

‘चला हवा येउद्या’ च्या सेटवर एकदा सुनील गावस्कर आणि अशोक सराफ आले होते, तेव्हा अशोक सराफ यांनी लहानपणीचे किस्से सांगितले. म्हणाले, लहानपणी सुनील ज्या इमारतीत राहत होता तो संघ आणि माझ्या इमारतीतील संघ या दोन्हीमध्ये दर रविवारी क्रिकेटचा सामना रंगायचा. आम्हीही त्याच्यासोबत खेळायचो, खरं तर आम्ही खेळायचो म्हणजे आम्ही नुसते तिथं असायचो, केवळ तोच काय ते क्रिकेट खेळायचा.

अशोक सराफ यांनी सांगितले, त्याने बॉल मारला की तो आणायला आम्ही पाळायचो त्यावेळी तो आठ-दहा वर्षांचा होता एवढ्या वयातही तो मारत सुटायचा आणि आम्ही केवळ पळत असायचो. त्याला बाद करणं म्हणजे खूपच कठीण. आम्ही दोघांनी एकत्रित ‘गुरुदक्षिणा’ या नाटकात काम केलं होतं. या नाटकात सुनीलने कृष्ण आणि मी बलरामची भूमिका साकारली होती. या नाटकादरम्यानचा फोटो आजही त्यांच्याकडे आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now