संपूर्ण जगभरात लोकप्रिय असणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना शनिवारपासून सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या पहिल्याच दिवशी चेन्नई सुपर किंग्जने केकेआर संघाचा दणदणीत पराभव केला आहे. तर रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. दरम्यान या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर फलंदाज सुनिल गावसकर यांनी आयपीएलच्या सेमी फायनलविषयी एक भाकित व्यक्त केले आहे.
सुनिल गावसकर यांनी आयपीएलच्या सेमी फायनलपर्यंत कोण पोहचेल याची भविष्यवाणी केली आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी समालोचन करताना सुनिल गावसकर मुंबई इंडियन्स नक्कीच सेमी फायनलमध्ये दिसेल अशी खात्रीपूर्ण माहिती दिली आहे. तसेच, “गेल्या काही हंगामात दिल्ली कॅपिटल्सने देखील दमदार कामगिरी केली असल्यामुळे ते देखील सेमी फायनल खेळू शकतील.” असा अदांज व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी केकेआर देखील सेमी फायनल खेळू शकते असे सांगितले आहे. केकेआर संघ तगडा असल्याचे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे. सुनिल गावसकर यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडेन यांनी देखील सेमी फायनलमध्ये कोणते संघ जातील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
मॅथ्यू हेडेन यांनी सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जला आपली पसंती दर्शवली आहे. यासोबतच मुंबई सेमी फायनलपर्यंत पोहचू शकणार नसल्याचा अंदाज मॅथ्यू हेडेन यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सेमी फायनलमधून मुंबईला वगळल्या नंतर केकेआर आणि आरसीबी सेमी फायनलमध्ये दिसेल असे म्हटले आहे.
त्यामुळे आता गावसकर आणि मॅथ्यू हेडेन यांची भविष्यवाणी खरी ठरते का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी चेन्नई सुपर किंग्जने केकेआरविरोधात बाजी मारली आहे. तर रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चार गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंटर आणि गुजरात टाइटंस यांच्यात सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या
..त्यामुळे मी बॉलिवूडपासून दुर गेले होते, ‘रॉकस्टार’ फेम नरगिस फाखरीने केला मोठा खुलासा
काश्मीर फाइल्सवर सलमान खानने सोडले मौन, अनुपम खेर यांना फोन करत म्हणाला…
पराभवानंतर मुंबईला आणखी एक दणका! ‘त्या’ चुकीप्रकरणी मोठी कारवाई; रोहीत शर्माला शिक्षा
अभिनेता विल स्मिथने ऑस्करच्या मंचावरच निवेदकाला चोपले; पत्नीचा अपमान सहन झाला नाही






