Share

नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Gautami Patil Lavani Dancer: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. तिच्या शोमध्ये गर्दी आणि वाद काही नवीन नाहीत. पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. रिलस्टार गौतमी पाटील हिच्या बदनामीचे धक्कादायक प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे.

पुण्यात एका स्टेज शोदरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. गौतमी पाटीलची वाढती लोकप्रियता पाहता तिची बदनामी करण्यासाठी हे घृणास्पद कृत्य केल्याचा कयास बांधला जात आहे. गौतमीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गौतमीने तिच्या कृत्याबद्दल वारंवार माफी मागितली आहे. गौतमीचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल होताच समाजातून तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत असून नेटिझन्स गौतमीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

“लपून छपून महिलेचा कपडे बदलण्याचा व्हिडिओ व्हायरल करणे हा पुरुषार्थ नाही. एक कलाकार म्हणून तिचे कौतुक करा, तिची चूक असेल तेव्हा तिला ट्रोल करा.” “हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथल्या कुजलेल्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीच साथ देईल, हे कदापि शक्य नाही.”

अश्लील व्हिडीओ बनवून तिची बदनामी करणाऱ्या गौतमी पाटीलवर कडक कारवाई करावी…!”, “ती चुकीचा डान्स करत होती हे खरे आहे आणि तिच्यावर बंदी घातली पाहिजे. (तिने तिची चूक मान्य केली आहे). पण आज गौतमी पाटीलवर अन्याय झाला आहे आणि पोलीस अधिकारी नक्कीच दोषींना सापडवतील.

अशा प्रतिक्रियांना उत्तर देताना नेटकऱ्यांनी गौतमीच्या व्हायरल व्हिडिओचा निषेध केला आणि तिचे समर्थन केले. याशिवाय दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गौतमीच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर मोहीमही चालवली जात आहे.

गौतमी पाटील ही एक डान्सर आहे. तिने लावणी सम्राज्ञी म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या लावणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिने तिच्या नृत्यातून अनेकांच्या मनावर छाप उमटवली आहे. गौतमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

यासोबतच गौतमीला अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये बोलवले जात असते. त्याचे तिला मानधनही दिले जाते. गौतमीचे वय जवळपास २७ वर्षे आहे. गौतमीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाटील ही नुकतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमीने एका कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्याने ती प्रचंड ट्रोल झाली होती. तिच्या विचित्र स्टेप्सचा हा डान्स व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रातून तिच्यावर टीका केल्या गेल्या.

मिरज तालुक्यातील बेडग इथे एक लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध लावणी स्टार गौतमी पाटील हिने या कार्यक्रमात आपली लावणी सादर केली. तिची लावणी पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हा परिषद शाळेच्या जवळच हा लावणीचा कार्यक्रम सुरु होता.

गौतमी पाटीलची लावणी सुरु असताना प्रेक्षक चक्क शाळेच्या छतावर जाऊन बसले. इतकेच नव्हे ते तिथे नाचूही लागले. त्यामुळे शाळेच्या छताचा पार चुराडा झाला. छतावरील कौलांचं प्रचंड नुकसान झालं. तसेच काही प्रेक्षक लावणी पाहण्यासाठी झाडावर जाऊन बसले. त्यामुळे झाडही कोसळले.

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now