Gautami patil | गेल्या बऱ्याच दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडीयावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण तिच्या डान्सवर पुर्ण महाराष्ट्रातून टीका केली जात आहे. नृत्यात अश्लीलता असल्याचे आरोप तिच्यावर झाले आहेत.
सोशल मिडीयावरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लावणी या प्रकाराला बदनाम केल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. गौतमीच्या नृत्यात अश्लीलता असल्याने तिने नृत्य करणे बंद करावे अशी मागणी बऱ्याच लोकांनी केली आहे. पण या गोष्टी सोडल्या तर बाकी बऱ्याच गोष्टींमुळे गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.
सोशल मिडीयावर तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या याच फॅन फॉलोइंगचा फायदा घेत एका हॉटेल मालकाने तिच्या हस्ते आपल्या हॉटेलचा उद्घाटन करून घेतले. एवढेच काय तर त्या हॉटेल मालकाने तिच्या थाळी देखील सुरू केली आहे. महेश गोरे असे त्या हॉटेल मालकाचे नाव आहे.
सोलापूरमध्ये टेंभुर्णी येथे त्यांचे सुमाना नावाचे हॉटेल आहे जे त्यांनी नुकतेच खोलले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील काय सांगता येत नाही आणि याचेच उदाहरण कोल्हापूरात पाहायला मिळाले. टेंभुर्णी येथे हॉटेल सुमन या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन झाले.
यावेळी गौतमी पाटीलला बोलावण्यात आले होते. महेश गोरे हे गौतमी पाटीलचे फॅन आहेत त्यामुळे त्यांनी तिलाच या हॉटेलचे उद्घाटन करण्यास आमंत्रित केले होते. गौतमी पाटीलच्या नावाने थेट थाळी सुरू करत त्यांनी मार्केटिंगची नवी शक्कल शोधून काढली आहे.
आता त्यांची ही शक्कल कितपत प्रसिद्ध होईल हे येणारा काळ सांगेलच. दरम्यान, अनेक वादात अडकूनही गौतमी पाटीलची प्रसिद्धी कमी झाली नाही. उलट तिची क्रेझ तरूणाईमध्ये वाढतच चालली आहे. गावोगावी तिला अनेक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते.
हजारोंच्या संख्येने लोक तिचे नृत्य पाहण्यासाठी येत असतात. गौतमी पाटील थाळीची किम्मत २४० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्पेशल थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोडी, गुलाबजाम अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
urfi javed : उर्फी जावेद करणार भाजपमध्ये प्रवेश? स्वतःच ट्विट करत म्हणाली मी भाजपमध्ये प्रवेश….
गौतमी पाटीलच्या पहील्या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार ‘हा’ दिग्गज अभिनेता; पहा कुणाला लागली लाॅटरी
Adani : मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरुन ठेवा…; वीज कर्मचाऱ्यांनी घेतला संपावर जाण्याचा निर्णय
मेंदूत लिंबाएवढी गाठ, थोडीही गडबड झाली तर पॅरालिसीस पक्का; पण चिमुरड्याचे धाडस अन् डाॅक्टरांची कमाल