gautami patil success story | गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटील चांगलीच चर्चेत आहे. गौतम आधी अश्लिल डान्समुळे चर्चेत आली होती. त्यानंतर मंगळवारी तिच्या एका कार्यक्रमादरम्यान गर्दीत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेत आपली बाजू सांगितली.
संबंधित घटनेचा आपल्याशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला असावा असे गौतमी पाटीलने म्हटले आहे. यावेळी तिने आपण डान्सर कसे झालो हे सुद्धा सांगितले आहे. लहानपणीच आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली होती, असे गौतमीने म्हटले आहे.
गौतमी पाटील ही मूळची कोल्हापूरची असल्याचे म्हटले जात होते. पण ती मूळची खान्देशची आहे. तिचे धुळ्यातील शिंदेखेडा असे गाव आहे. तर तिच्या वडिलांचे चोपडा हे गाव आहे. तिच्या आईचं गाव शिंदेखेडा होतं. यावेळी तिने आपण लहानपणी कोणत्या अडचणींचा सामना केला हे सुद्धा तिने सांगितले आहे.
गौतमी म्हणाली की, माझ्यासोबत वडील नाहीत. माझा जन्म होण्याआधीच त्यांनी माझ्या आईला सोडलं होतं. तेव्हा आईला नववा महिना सुरु होता. मी पोटात असतानाच वडीलांनी आईला सोडलं होतं. त्यामुळे आई तिच्या आईवडिलांकडे राहायची. माझ्या आजी-आजोबांनीच मला सांभाळलं आहे.
मी माझ्यावडिलांना पाहिलं नव्हतं. आठवतीत असताना मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. त्यांना पुण्यात आणण्याचाही प्रयत्न केला. पण ते पुण्यात व्यवस्थित राहिले नाही. ते ड्रिंक वगैरे करत होते. त्यामुळे आम्ही त्यांनी सोडलं, असेही गौतमी पाटीलने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
आईने जॉब केला. बिसलेरी आणि इतर काही कंपन्यांमध्ये काम केलं. नंतर आईचा अपघात झाला, तिला टाके पडले होते. त्यावेळी मी शिक्षण घेत होती. पण आईचा अपघात झाल्यामुळे तिचं काम सुटलं. त्यामुळे मी शिक्षण सोडलं आणि या क्षेत्रात पाऊल टाकलं, असे गौतमीने म्हटले आहे.
तसेच आठवीत असतानाच पुण्यात आली होती. पण घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण कमी झालं. सुरुवातीला मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे मला नेण्यात आलं होतं. अकलूज लावणी महोत्सवात मी बॅक डान्सर म्हणून होती. तेव्हा मला ५०० रुपये मानधन मिळाले होते. त्यानंतर मी पुढे आली, असेही गौतमीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : गौतम गंभीरने पुन्हा मारली पलटी, विराटबद्दल केले हैराण करणारे वक्तव्य; म्हणाला, तो बाबर आणि स्मिथपेक्षा…
Rohit sharma : ‘तो बुमराहची थोडीही कमी जाणवू देत नाही’; अर्शदीपच्या कामगिरीवर रोहीत फिदा, म्हणाला…
KL Rahul : धडाकेबाज अर्धशतक करूनही नाराज आहे राहूल; सामन्यानंतर दिली हैराण करणारी प्रतिक्रीया, म्हणाला…