Share

gautami patil : गौतमीसाठी म्हातारेही झाले पागल, खुर्च्या बॅरिकेट्स तोडून लोकं स्टेजवर; सोलापूरात तुफान राडा

gautami patil

gautami patil solapur events | राज्यभरात गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरली आहे. ती लावणी नाही तर अश्लील डान्स करते म्हणत तिच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. पण आपण लावणी बंद करणार नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले होते. त्यामुळे तिच्या कार्यक्रम नेहमीप्रमाणे होताना दिसत आहे.

अशात सोलापूरात गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला इतकी गर्दी होती की लोकांना बसायला काय तर उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे खुर्च्या मोडून आणि बॅरिकेट्स तोडून लोकं स्टेजपर्यंत येत होती.

सोलापूरमधील नातेपूते गावात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तरुणांसोबतच वृद्ध लोकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त होती. अशात काहींना तर उभंही राहता येत नव्हतं.

तसेच काही लोकांना बसायला जागा मिळत नसल्यामुळे त्यांनी थेट खुर्च्याच फेकल्या आणि जागा रिकामी केली. गर्दीला आवर घालण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅरिकेट्स सुद्धा लावण्यात आले होते. पण ते बॅरिकेट्स तोडून तरुणांनी आत प्रवेश केला.

गौतमीच्या प्रत्येक दिलखेच अदावर तरुणाई थिरकत होती. कोणी शिट्ट्या वाजवत होतं, तर कोणी तिच्यासारखा ठेका धरत होतं. अनेकजण तर स्टेजपर्यंतही पोहचले होते. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच आवर घालण्यास सुरुवात केली.

गौतमीने लावणीनंतर कार्यक्रमावर प्रतिक्रियाही दिली आहे. सबसे कातील गौतमी पाटील या ट्रेंडमुळे आनंद होतोय. लोक माझ्यावर प्रेम करत आहे. माझा सन्मान करत आहे. नियोजन चांगले होते. म्हणून कार्यक्रम चांगला झाला. १ तारखेला माझी लावणी येतेय. मी लावणी कलाकार नव्हते. पण जनतेच्या प्रेमामुळे मी लावणी शिकले, असे गौतमीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
shinde group : शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भर रस्त्यात भाजप नेत्यावर खुनी हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
ajit pawar : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांना जाणीवपूर्वक…; अजित पवार स्पष्टच बोलले 
अपघातानंतर तडफडणाऱ्या पंतला मदत करण्याऐवजी स्थानिक लोकांनी केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now