Share

gautami patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, तरुण अचानक स्टेजवर चढले अन्…; व्हिडिओ व्हायरल

gautami patil

gautami patil event beed  | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. ती लावणीच्या नावाखील अश्लील हातवारे करत नृत्य करते, अशी टीका वारंवार तिच्यावर होताना दिसून येत आहे. ती लावणी करताना चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याचे समोरही आले होते.

गौतमीच्या अश्लील डान्सची व्हिडिओ क्लीप सुद्धा व्हायरल झाली होती. आता गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बीडमध्ये गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. बीडच्या राजुरी शिवारात एका कार्यक्रमासाठी गौतमी पाटीलची लावणी ठेवण्यात आली होती. त्यावेळी हा राडा झाला आहे.

गौतमी पाटीलच्या डान्सवेळी तिला पाहण्यासाठी लोकांनी खुप गर्दी केली होती. त्यावेळी डान्स सुरु असताना अचानक मोठ्या प्रमाणात लोक स्टेजवर चढले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. हा प्रकार घडला तेव्हा काही लोकांनी स्टेजवर दगडफेक झाल्याचेही म्हटले आहे.

या कार्यक्रमात गौतमी पाटीलला काहीही दुखापत झाली नसून ती पुर्णपणे सुखरुप आहे. पण कार्यक्रम चालू असताना हा कार्यक्रम बंद करण्याची वेळ आयोजकांवर आली होती. हा कार्यक्रम बीड-परळी या महामार्गावर होता. त्यामुळे महामार्गावर जवळपास १ तास ट्रॅफिक झाली होती.

अशात गौतमी पाटीलला पाहण्यासाठी काही तरुण हे चक्क झाडावर चढले होते. ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे तिथे आचारसंहिता लागू आहे. पण आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राजुरी शिवारात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो तरुणांनी गर्दी केली होती. पण अचानक गर्दी स्टेजवर चढल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती-पत्नीसह ११ महिन्यांचे बाळ जखमी; कारचा झाला चुराडा
shivsena : शिंदेंना दणका! ‘या’ जिल्ह्यात शिंदे गटात गेलेले सगळेच्या सगळे शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात दाखल
सुशांत सारखीच वेळ माझ्यावरही आली होती, पण…; विवेक ओबेराॅयने सांगीतली बाॅलीवूडची घाणेरडी बाजू

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now