गौतमी पाटीलने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले.
गौतमी पाटील नेहमीच तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत असते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लावणी सादर करून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
अनेक गावात तिचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमते. गौतमी पाटीलवर वारंवार अश्लील नृत्य केल्याचा आरोप आहे. गौतमीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच लग्नाबद्दल बोलले आहे.
गौतमीने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. “माझे शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झाले. बाबा लवकर वारले. त्यानंतर घरात कोणीही पुरुष नव्हता. ना वडील, ना भाऊ, ना नातेवाईक.
माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचे आहे” असे गौतमी म्हणाली.
तिला नवरा कसा हवा आहे याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली, ‘मला पैसा, बंगला, प्रतिष्ठा याची गरज नाही. पण मला असा जोडीदार हवा आहे जो मला कोणत्याही परिस्थितीत साथ देईल. असा मुलगा मिळाल्यावरच मी लग्नाचा विचार करेन.
आता माझे वय 25 वर्षे आहे. माझे लग्न झालेले नाही. पण मला लवकरच लग्न करायचं आहे.” गौतमी याआधीही अनेकवेळा कुटुंबाबद्दल बोलली आहे. आई-वडिलांबाबत तिने अनेक विधाने केली आहेत. पण यावेळी ती पहिल्यांदाच लग्नाबद्दल उघडपणे बोलली आहे. आधी तिने याबद्दल बोलणे टाळले होते.
गौतमीच्या कामाबद्दल सांगायचे तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. नुकतेच तिचे तेरा पता हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. प्रत्येकजण तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. ती कायम दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत असते. गौतमी पाटील हीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. पण काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर गौतमी पाटील संपुर्ण खचून गेली आहे. इतकच नाही तर गौतमीला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. नेटकरांनी गौतमीच्या त्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत.
तसेच राजकीय क्षेत्रातून देखील गौतमीच्या व्हिडिओवरुन प्रतिक्रिया येत आहेत. लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी देखील गौतमीच्या हा व्हिडिओ शेअर करु नका अशी विनंती केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जत्रा, यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यात्रेत मनोरंजनासाठी कीर्तन, तमाशा आयोजित करतात. गौतमी पाटीलला राज्यात प्रचंड प्रतिसाद आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका आणि विरोध केला. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील यांचे उदाहरण देऊन समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर भाष्य केले आहे.
आपल्या विधानांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडमध्ये आयोजित कीर्तनात ते बोलत होते. तेव्हा त्यांनी आपल्या खास शैलीत गौतमीवर टिका केली आहे.
तिने तीन गाणी वाजवली तर ती तीन लाख रुपये घेते आणि आम्ही कीर्तनकारांनी ५ हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. बी