gautam gambhir talking about virat kohli | टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने टी २० वर्ल्ड कपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या फलंदाजीने सगळेच हैराण झाले आहे. ज्या सामन्यात तो नाबाद राहिला त्या सामन्यात भारतीय संघाचा विजय पक्का आहे.
दिग्गज क्रिकेटपटूही त्याचे कौतूक करताना दिसून येत आहे. या यादीत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचाही समावेश झाला आहे. गंभीर अनेकदा विराट कोहलीवर टीका करताना दिसून येत असतो. पण आता गौतम गंभीरने सुद्धा विराट कोहलीचे कौतूक केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने सध्याच्या टी २० विश्वचषकात आतापर्यंत चांगला खेळ केला आहे आणि सुपर-१२ फेरीतील ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाच्या नजरा आता सेमी फायनलमधील आपले स्थान पक्के करण्यावर आहे.
भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. विशेष म्हणजे भारताने जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विराटने खूप धावा केल्या आहेत. त्याने त्या तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी केली आहे.
विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने आता विराट कोहलीचे कौतुक केले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा महान खेळाडू जो रूट यांच्यापेक्षा विराट कसा सरस आहे हे गंभीरने सांगितले आहे.
गंभीरने म्हणाला की, विराट कोहलीला खेळाडूंसोबत भागीदारी कशी करायची हे माहित आहे. भारताच्या फलंदाजीच्या वेळी त्याने खेळ चांगला संपवला. सूर्यकुमार आऊट झाल्यानंतर तो आज खरा हिरो बनला. यामुळेच बाबर, स्मिथ, विल्यमसन, जो रूट या खेळाडूंपेक्षा तो भारी आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहली टी २० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने महेला जयवर्धनेचा विश्वविक्रम मोडला. टी २० वर्ल्डकपमध्ये कोहलीचा एव्हरेज ८० च्या वर आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १३० पेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा एकूण एव्हरेज ५३ पेक्षा जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
Rohit sharma : ‘तो बुमराहची थोडीही कमी जाणवू देत नाही’; अर्शदीपच्या कामगिरीवर रोहीत फिदा, म्हणाला…
Virat kohli : जसं मला कळालं, वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये आहे तसं मी.., विराटने खोललं आपल्या कमबॅकचं रहस्य
T-20 World Cup : भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानचा रडीचा डाव; समीकरण बदलणार?