gautam gambhir shocking statement on world cup 2011 | मंगळवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने तो सामना २ धावांनी जिंकला आहे. पण तो सामना सुरू होण्यापूर्वीच लोकांना २०११ च्या वर्ल्डकपची आठवण झाली. कारण तो सामनाही वानखेडेवरच खेळला गेला होता.
अशात भारताचा माजी स्टार खेळाडू गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर त्या सामन्याबद्दल प्रतिक्रिया देत होता. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा २०११ च्या वर्ल्डकपबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
खरं तर, जेव्हा जेव्हा कुणाला वर्ल्ड कप आठवतो तेव्हा प्रत्येकाला धोनीच्या त्या जबरदस्त षटकाराची आठवण येते. तसेच गंभीरची ९७ धावांची खेळीही सर्वांच्या मनात घर करून आहे. धोनी आणि त्याच्या षटकारामुळे भारताने हा सामना जिंकला असे अनेकांचे मत आहे, तर काही लोक युवराज सिंगची संपूर्ण टूर्नामेंटमधील कामगिरी लक्षात ठेवून त्याला हिरो मानतात.
आता गौतम गंभीरने फायनचा खरा हिरो कोण होता हे सांगितले आहे. विशेष म्हणजे त्याने यात धोनी, युवराज किंवा स्वत:चे नाव घेतले नाही तर एका गोलंदाजाचे नाव घेतले आहे. गंभीरच्या मते २०११ च्या वर्ल्डकपचा खरा हिरो झहीर खान होता.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला की, लोक धोनीच्या विजयी षटकाराबद्दल बोलतात. त्या सामन्यात मी ९७ धावा केल्या त्याबद्दलही लोक बोलतात. पण त्या वर्ल्डकपचा खरा हिरो झहीर खान होता.
झहीर खानने फायनलसाठी मार्ग बनवला होता. तसेच श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात झहीर खानने सुरुवातीपासूनच श्रीलंकेवर दडपण कायम ठेवले होते. त्या सामन्यात त्याने दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच १० षटकात फक्त ६० धावा दिल्या होत्या. त्यामुळे तोच खरा हिरो होता, असेही गंभीरने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुकेश अंबानींचा नातू पृथ्वी अंबानीची जंगी बर्थडे पार्टी; आपल्या मुलांसोबत पोहोचले सेलेब्रिटी, पहा फोटो
एकेकाळी फक्त १८ रुपयांना मिळायची सायकल; आजोबांच्या काळातील बिल बघून धक्का बसेल
आधी हातपंप, आत थेट बैलगाडीचं चाक; ‘गदर २’ मध्ये दिसला सनी देओलचा रांगडा लूक; पहा व्हिडीओ