यंदाच्या आयपीएल 2022 च्या सामन्यातील लखनऊ सुपर जायंट्स या नव्या टीमचा प्रवास संपला आहे. बुधवारी म्हणजेच काल दिनांक 25 रोजी लखनऊ सुपर जायंट्स या नव्या टीमचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊचा 14 रन्सने पराभव केला. यानंतर टीमचा मार्गदर्शक गौतम गंभीर निराश झालेला पाहायला मिळाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला त्यामुळे आता बेंगळुरू क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्स ही नवी टीम यावर्षी आयपीएल मध्ये खेळायला आली होती. या टीमचा कर्णधार केएल राहुल आहे.
आयपीएलच्या सुरुवातीपासून केएल राहुलच्या या टीमचा खेळ चांगला दिसून आला. या टीमचा एवढा सामना रंगला होता की, लखनऊ सुपर जाएंट्स यंदाची आयपीएल जिंकण्याची दावेदार मानली जात होती. मात्र रॉयल चॅलेंजर बंगळूरूने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.
लखनऊ सुपर जायंट्स सामन्यातून बाहेर पडल्यामुळे आता या टीमचा मार्गदर्शक गौतम गंभीर निराश झालेला पाहायला मिळाला आहे. सामना हरल्यामुळे आता केएल राहुलला गौतम गंभीरने चांगलेच फटकारले आहे. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि राहुल मैदानावरच बोलताना दिसले.
ते दोघे बोलत असताना हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा फोटोही व्हायरल झाला. हे पाहून गौतम आणि राहुल गंभीर मंथन करत असल्याचं दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुर विरुद्धच्या या एलिमिनेटर सामन्यात लखनौ टीमने खूप चुका केल्या.
कालच्या सामन्यात या टीमने फिल्डींग करत असताना अनेक कॅचंही सोडले. शिवाय फलंदाजीत जे अपेक्षित होतं ते दिसलं नाही. या सर्व गोष्टींबाबत गंभीरने राहुलशी चर्चा केली असल्याचं फोटो पाहून म्हटलं जात आहे. गौतम गंभीर राहुलला यावेळी नेमकं काय बोलत होता याबद्दल तर्क वितर्क लावेल जात आहेत.