श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे गौतम अदानी यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील सगळ्यात मोठे श्रीमंत गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. एवढेच नाही तर, जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर पडले आहेत.
माहितीनुसार, मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार अदानी यांची एकूण संपत्ती 6.42 अब्ज डॉलरने म्हणजेच 49,598 कोटी रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीतून आता सहाव्या स्थानावर घसरले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती आता 108 अब्ज डॉलर झाली आहे. एका वर्षी त्यांची एकूण संपत्ती 31.9 अब्ज डॉलरवर पोहोचली होती आणि ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. मात्र मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आणि ते श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरले.
माहितीनुसार, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 232 अब्ज डॉलर आहे. तर, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 133अब्ज डॉलर आहे.
119अब्ज संपत्तीसह गेट्स या यादीत चौथ्या आणि बफे 113 अब्ज संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. फ्रेंच उद्योगपती आणि LVMH Moët Hennessy चे बर्नार्ड अर्नॉल्ट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 120 अब्ज डॉलर इतकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश या यादीत दहाव्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 90.7 अब्ज एवढी आहे.
दरम्यान, गौतम अदानी यांनी एक वक्तव्य केले होते. हे वक्तव्य देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल होते. ते म्हणाले की, जर भारत 2050 च्या अंदाजानुसार, 30 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश झाला तर देशातली एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही. या काळात आपण देशातून प्रत्येक स्वरूपातली गरिबी हटवू शकतो, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला होता.