भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना गेल्या काही दिवसांपासून हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना रोज नवीन धक्का बसत आहे. ते आधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. पण आता ते २१ व्या क्रमांकावर गेले आहे.
अदानी यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस कपात होत आहे. असे असतानाच आता अदानींना आणखी एक धक्का बसला आहे. अदानी एंटरप्राईझेसला अमेरिकन शेअर मार्केट डॉ जॉन्समधून काढण्यात आले आहे. डॉ जॉन्स आणि एसपीमधून त्यांना काढण्यात आले आहे.
डॉ जॉन्सच्या या निर्णयानंतर भारतात अदानी एंटरप्राईझेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घरसण पाहायला मिळाली आहे. लोअर सर्किट लागल्यानंतर अदानी पोर्टमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे.
अदानी ग्रीन एनर्जी व अदानी टोटल गॅसचा शेअरही लोअर सर्किटवर आला आहे. युएस शेअर बाजाराने अदानी एंटरप्राईझेसला डॉ जॉन्सच्या सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ७ फेब्रुवारीपासून त्याला त्या इंडेक्समधून काढून टाकण्यात येणार आहे.
अदानी ग्रुपला गेल्या काही दिवसांत प्रचंड नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यांचे नुकसान रोखण्याच्या उद्देशाने NSE ने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अदानी पोर्टच्या एफ अँड ओ स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे. तसेच आता अदानी पोर्ट आणि एंटरप्राईझेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अदानी हे २०२२ मध्ये सर्वात जास्त पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते. त्यामुळे ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. पण २०२३ च्या सुरुवातीलाच जेफ बेजॉस यांनी त्यांना मागे टाकले होते. त्यानंतर हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या.
महत्वाच्या बातम्या-
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा
वाहतूक नियमन करत असताना पोलिस अधिकाऱ्याचे हार्ट अटॅकने निधन, पुण्यातील हृदयद्रावक घटना
कांदे विक्रतेच्या प्रामाणिकपणाला सलाम; सापडलेले आठ लाखांचे दागिने केले परत