अमेरिकेची रिसर्च फर्म हिंडनबर्गने प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपचे शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली कोसळल्या आहे.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी वादात सापडले असून त्यांची संपत्ती दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गौतम अदानी चर्चेत आल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर येत आहे. त्यांनी दोन वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. एकदा दहशतादी हल्ल्यावेळी आणि दुसऱ्या वेळेस गुंडांनी अपहरण केले होते त्यावेळी.
गौतम अदानी यांनी शुन्यातून सर्व गोष्टी निर्माण केल्या आहे. १९९७ मध्ये गौतम अदानी हे नवीन उद्योजक होते. असे असले तरी त्यांच्या कल्पनांमुळे आणि मार्केेटिंगमुळे त्यांचा व्यवसाय देशात झपाट्याने पसरत होता. त्यामुळे एकदा त्यांचे अपहरण झाले होते. त्या गुंडांनी त्यांच्याकडे ११ कोटींची मागणी केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी १ जानेवारी १९९८ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. गौतम अदानी यांच्यासोबतच उद्योगपती शांतीलाल पटेल यांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर कसेबसे तरी ते दोघे त्यांच्या तावडीतून सुटले होते. आजही गौतम अदानी त्यावर बोलत नाही. त्या अपहरणामागे अंडरवर्ल्ड डॉन फजल उर रहमान यांचा हात असल्याचे म्हटले जाते.
२००८ मध्ये गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मृत्यूला चकवा दिला होता. २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी गौतम अदानी सुद्धा ताज हॉटेलमध्ये होते. ताज हॉटेलमध्ये हल्ला झाला तेव्हा १६० जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अदानी सुद्धा ताज हॉटेलमध्येच होते.
गौतम अदानी तेव्हा दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद शराफ यांच्यासोबत वेदर क्राफ्टमध्ये डिनर करत होते. त्यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना तळघरात नेले होते. त्यामध्ये अदानी सुद्धा होते. दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांना सुरक्षा दलाने बाहेर काढले होते. मी १५ फुट अंतरावरुन मृत्यूला बघितलंय असेही अदानींनी एका मुलाखतीत म्हटले होते.
अदानी आधी जगातील टॉप ३ श्रीमंतांमध्ये होते. पण आता ते १५ व्या स्थानावर पोहचले आहे. त्यांच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. जर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समित्यांमधून त्यांना क्लीनचिट मिळाली तर त्याचा अदानी समुहाला चांगला फायदा होऊ शकतो. पण जर तसे झाले नाही तर त्यांचे आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
कांदे विक्रतेच्या प्रामाणिकपणाला सलाम; सापडलेले आठ लाखांचे दागिने केले परत
सारा तेंडूलकर की सारा अली खान? शुभमनच्या अफेअरचे रहस्य उलगडलं, थेट दोघांचा फोटो आला समोर
..अन् क्षणात अदानींचे ७५०००००००००० कोटी रुपये गेले पाण्यात, श्रीमंतांच्या यादीत थेट १५ व्या स्थानी घसरण