सिमेंट व्यवसायात (Cement Business) अदानी ग्रुप (Adani Group) मोठा धमाका करणार आहे. अदानी ग्रुपने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा संपूर्ण भारतातील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी अंबुजा आणि ACC सिमेंट मधील होल्सीम ग्रुपचे (Holcim Group) संपूर्ण स्टेक १०.५ अरब डॉलर मध्ये विकत घेण्यासाठी समूहाने एक मोठा करार केला आहे.(Gautam Adani became the King of Cement Industry)
अदानी ग्रुपने केलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. याशिवाय, पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रात भारताचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संपादन आहे. होल्सीम ग्रुपकडे अंबुजा सिमेंट्समध्ये ६३.१९ टक्के हिस्सा आहे, जो आता अदानी ग्रुपच्या मालकीचा असेल. त्याचप्रमाणे ACC मध्ये होल्सीम ग्रुपचा ५४.५३ टक्के हिस्सा होता. ही स्विस कंपनी १७ वर्षांपूर्वी भारतात दाखल झाली.
JSW प्रमाणेच, अदानी ग्रुपने अलीकडेच सिमेंट विभागात प्रवेश केला आहे. दोघेही आक्रमकपणे सिमेंट व्यवसाय वाढवत आहेत. सध्या आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक ही भारतीय सिमेंट बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेकची वार्षिक उत्पादन क्षमता ११७ दशलक्ष टन आहे.
अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेडची एकत्रित क्षमता वार्षिक ६६ दशलक्ष टन आहे. म्हणजेच आता अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अंबुजा आणि ACC हे भारतातील दोन आघाडीचे सिमेंट ब्रँड आहेत. दोन्ही कंपन्यांचे २३ सिमेंट प्लांट, १४ ग्राइंडिंग स्टेशन, ८० रेडी-मिक्स कॉंक्रीट प्लांट आणि भारतभरात ५०००० हून अधिक चॅनल पार्टनर आहेत.
भारतातील सिमेंटचा वापर प्रति व्यक्ति केवळ २४२ किलो आहे, मात्र जागतिक सरासरी ५२५ किलो प्रति व्यक्तीच्या तुलनेत आहेत. भारतात सिमेंट क्षेत्राच्या वाढीसाठी लक्षणीय शक्यता आहे. जलद शहरीकरण, वाढणारा मध्यमवर्ग आणि परवडणारी घरे, तसेच बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रे या महामारीतून सावरत आहेत, यामुळे पुढील काही दशकांत सिमेंट क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे.
अदानी ग्रुपने गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर्स आणि क्लीन एनर्जी यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करून विविधीकरण केले आहे, शिवाय बंदरे, वीज प्रकल्प आणि कोळसा खाणी या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त ग्रुपने गेल्या वर्षी सिमेंट क्षेत्रात अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड या दोन उपकंपन्या स्थापन केल्या होत्या. अदानी सिमेंटेशन लिमिटेड गुजरातमधील दहेज आणि महाराष्ट्रातील रायगड येथे दोन सिमेंट युनिट्स उभारण्याची योजना आखत आहे.
महत्वाच्या बातम्या-
अदानी ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, २ महिन्यात दिले २०० टक्के रिटर्न
अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअरने घातला धुमाकूळ, गुंतवणूकदारांना दिला ८६,६८० टक्के परतावा
अदानी ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदार झाले मालामाल, दिला तब्बल ७ हजार टक्के परतावा
अदानी ग्रुपला मिळाला महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा कॉन्ट्रॅक्ट, ‘या’ जिल्ह्यांना पुरवणार CNG गॅस