Share

Gaurav More : “भीमराया आमच्या श्वासावर तुमचे उपकार…”, लंडनला जाऊनही आंबेडकरांना नाही विसरला हास्यजत्रा’फेम गौरव मोरे; खास फोटो पोस्ट करत म्हणाला,

gaurav more visit amabedkar house in london | महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले आहे. त्यातलाच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. लोकांना हसता यावं यासाठी अनेकदा तो स्वत;चा अपमानही सहन करतो. असा एकही दिवस गेला नसेल, जेव्हा स्किटमध्ये त्याचा अपमान झाला नसेल.

आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरवाडा असं म्हणत तो महाराष्ट्राच्या घराभरात पोहचला आहे. सध्या तो लंडनला आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असल्याने तेथून तो अनेक फोटो शेअर करत आहे. आता त्याने लंडनमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला भेट दिली आहे.

तसेच त्या भेटीचा गौरवने एक फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहे. हा फोटो शेअर करत गौरवने बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात वास्तव्य केले होते ते हे घर आहे.

गौरवने बाबासाहेब आंबेडकरांच्या घराबाहेरचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली त्याने खास कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले आहे की, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, कोणते आकाश हे, तु आम्हा नेले कुठे… तु दिलेले हे पंख, पिंजजरे गेले कुठे… या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना….तुमच्यामुळे आज आमचं असित्व आहे. आमच्यावर श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा.

गौरव मोरेची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्याला खुप व्हायरल होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट दिल्यामुळे गौरवचे सोशल मीडियावर खुप कौतूकही होत आहे. अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंटही केल्या आहे. २७ हजारपेक्षा जास्त लोकांनी त्याचा हा फोटो लाईक केला आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now