सध्या बिहारचा असलेला छोटा सोनू कुमार (Sonu Kumar) सर्वत्र चर्चेत आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय सोनू कुमारने अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याकडे जाऊन अभ्यासासाठी मदतीची याचना केली. जेव्हा अभिनेत्री गौहर खानने (Gauahar Khan) सोनू कुमारचा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती त्याची चाहती बनली. तिने लगेच सोनू कुमारसाठी मदतीचा हात पुढे केला.( Gauhar Khan to pay for boy’s education)
गौहर खान म्हणाली की तिला सोनूशी संपर्क साधायचा आहे आणि त्याच्या अभ्यासाचा खर्च करायचा आहे. गौहर खानने ट्विट करून सोनू कुमारची माहिती मागितली आहे. तिने त्याला आर्थिक मदत करण्यासाठी त्याचे कॉन्टैक्ट डीटेल मागितले. गौहर खानने सोनू कुमारबद्दल ट्विट केले, किती तेजस्वी मुलगा आहे. मला त्याचे कॉन्टैक्ट डीटेल मिळू शकतो का? त्याच्या शिक्षणाचा खर्च मला उचलायचा आहे. हा मुलगा छान आहे. त्याला एक विजन आहे, भविष्य आहे. कृपया मदत करा.
What a bright boy ! Can I pls get to know some contact of him , I would like to sponsor his education. This boy is amazing . He has a vision , he is the future . Pls help ! https://t.co/tTPSaPBqOF
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) May 15, 2022
सोनू कुमार सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नितीश कुमार नुकतेच त्यांच्या पत्नीच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त नालंदा येथील कल्याण बिघा नावाच्या गावात पोहोचले होते. मोठा जनसमुदाय जमला होता आणि तेव्हाच सोनू कुमारने खचाखच भरलेल्या गर्दीत नितीश कुमार यांच्यासमोर आपली समस्या सांगितली. सोनू कुमार यांनी नितीश कुमार यांना सांगितले होते, ‘प्रणाम सर, ऐका ना, आम्हाला अभ्यासाठी पाठींबा द्या ना, गार्डियन शिकवत नाही.’
यानंतर सोनू कुमारने आपल्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली. सोनू कुमारने सांगितले होते की, त्याच्या वडिलांचे दह्याचे दुकान आहे. पण त्यातून तो जे काही कमावतो, ते तो दारू पिण्यात खर्च करतो. सोनू कुमारने असेही सांगितले की, ज्या सरकारी शाळेत तो शिकतो, तिथे शिक्षकांनाही चांगले शिक्षण कसे द्यावे हे कळत नाही.
सोनू कुमारने सीएम नितीश यांच्या डोळ्यात डोळे घालून शिक्षणाची दुर्दशा सांगितली. सरकारने मदत केली तर मलाही शिक्षण घेऊन आयएएस, आयपीएस व्हायचे आहे, असे तो म्हणाला. सोनू कुमार सहावीत शिकता-शिकता इयत्ता ५वीपर्यंतच्या ४० मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या अभ्यासाचा खर्च भागवतो. नितीश कुमार यांच्याकडून आश्वासन मिळाल्याचे मुलाने सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
BIGG BOSS 15: गौहर खानच्या मते हा व्यक्ती आहे विजेता, तेजस्वी प्रकाश जिंकल्यानंतर गौहर खान नाखूश?
जेव्हा लीक झाली होती सलमान खानची ऑडिओ टेप, प्रिती झिंटासोबतच्या नात्याची झाली होती चर्चा
माझ्या आई-बहिणीची कोणी चेष्टा केली तर मीसुद्धा.., विल स्मिथच्या समर्थनार्थ उतरली कंगना
मी भारताचा कर्णधार होण्यासाठी सक्षम होतो पण; भज्जीचा BCCI वर खळबळजनक आरोप