Share

गंगुबाई काठियावाडीची ताबडतोड कमाई; बॉक्स ऑफिसवर जमा केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

मागील अनेक दिवसांपासून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची. मागील आठवड्यातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात येऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे.

इतकेच नव्हे तर या चित्रपटाने एका आठवड्यात १०० कोटींचा गल्ला केला आहे. तसेच या यशानंतर भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत हँडलवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ही पोस्ट शेअर करत असे सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाने जगभरात १०८.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ही पोस्ट शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की, ‘इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.’ तसेच आलियाने देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की, ‘अभिनेत्री होण्यासाठी आली होती गंगू, पूर्ण सिनेमा बनला आहे.’ त्याचबरोबर या चित्रपटात आलिया भट्टसह, शांतनू माहेश्वरी, अजय देवगन, सीमा पाहवा आणि विजय राज असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. तसेच कोरोना काळानंतर हा संजय लीला भन्साळी यांच्या सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी १०.५० कोटीची कमाई केली. तसेच दुसऱ्या दिवशी १३.३२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर, तिसऱ्या दिवशी १५.३० कोटी रुपये इतका गल्ला बोला केला. तर चौथ्या दिवशी हा आलेख उतरला आणि ८.१९ कोटींवर पोहचला. त्यानंतर असाच उतरता आले बुधवारी देखील पाहायला मिळाला. बुधवारी ६.२१ कोटींची कमाई केली.

मात्र, वर्ल्ड वाइड चित्रपट अप्रतिम कामगिरी करत आहे. आतापर्यंत १०८ कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार खूप खूश आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now