Share

गॅंगस्टर विकास दुबेच्या पत्नीचे योगींवर गंभीर आरोप, म्हणाली, ‘आमचा छळ केला जात आहे’

यूपीचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे याची पत्नी रिचा दुबेने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ऋचा दुबे म्हणाल्या की, थेट सीएम योगी या प्रकरणात वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून आम्हाला त्रास देत आहेत. पुढे त्या आमचे कुटुंब सर्वत्र भटकत आहे. आमची सुनवाईच होत नाहीये.

गेल्या वर्षी कानपूरच्या बिकरूमध्ये 8 पोलिसांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मुख्य आरोपी हा विकास दुबे होता. यूपी पोलिसांच्या या हत्याकांडानंतर काही दिवसांनी विकास दुबे चकमकीत मारला गेला होता. त्यावेळी हे प्रकरण पुर्ण देशात गाजले होते. या प्रकरणात अनेक खुलासे झाले होते. पण आता विकास दुबेच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन योगी आदित्यनाथ यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

ऋचा दुबे म्हणाल्या की, आमचा छळ केला जात आहे. मी माझ्या कुटुंबाला अनेक प्रकारे त्रास देऊन तोडले जात आहे. थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रकरण वैयक्तिक पातळीवर हाताळून आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत मला माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळालेले नाही. कोणाला विचारले तर हे मुख्यमंत्री योगींचे प्रकरण आहे असे सांगितले जाते.

कोणच आमचं ऐकून घेत नाही. आम्ही हॉस्पिटलपासून पोस्टमार्टम हाऊसपर्यंत घरोघरी फिरत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. ऋचा दुबे पुढे म्हणाल्या की, माझे वृद्ध सासरे घरोघरी फिरत आहेत. माझ्या भावजयीच्या मुलांना वाचता येत नाही. आमच्याकडे कमावण्यासारखे काहीच उरले नाही. आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत.

भाजपचे लोक आमच्या जमिनी आणि शेतजमिनी ताब्यात घेत आहेत. ऋचा दुबे असेही म्हणाल्या की, त्यांचा भागीदार असलेल्या राजू वाजपेयी नावाच्या व्यक्तीने जमिनीवर कब्जा केला. सरकार आणि प्रशासन कोणीच ऐकत नाही. आमच्या शेतात धान्य पिकवले जात असले तरी ते विकले जात नाही, अशी स्थिती आहे. कारण हे विकास दुबेच्या शेतात उगणारे धान्य आहे.

आम्ही आमच्या जीवन जगण्यास त्रासले आहोत. ऋचा दुबे पुढे म्हणाल्या की, आमची 13 बिघे जमीन ताब्यात घेण्यात आली. ही जमीन पोलिसांना मिळवून दिली. मात्र एका अधिकाऱ्याने जमिन मिळवून दिली असे त्यांना कळाले, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. लोक माझ्या घरी धमक्या देण्यासाठी येतात. तीन-चार महिने बाहेर राहावे लागले, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या
इजिप्शियन ममीच्या पोटात सापडलेल्या गर्भाचे गूढ उकलले, २००० वर्ष कसा राहिला सुरक्षित?
विद्यार्थीनीने शाळेतून घरी जाण्यास दिला नकार, शिक्षीकेने विचारपूस करताच झाला धक्कादायक खुलासा
टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक
टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक

राजकारण

Join WhatsApp

Join Now