Share

मुंबईत गॅंगवॉरला सुरुवात झाली असून, उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम आहेत- नितेश राणे

मुंबईत राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन झालेल्या वादावर आणि रात्री किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि एकूणच महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम आहेत, असे म्हणत राणेंनी टीका केली आहे.

काल राणा दाम्पत्य आणि सोमय्या यांच्याबाबत झालेल्या घटनेवर नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला. म्हणाले, राणेंचं घर पाडणं, सोमय्यावर हल्ला करणं, दरेकर यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवणं हीच कामं सध्या हे सरकार करत आहे. काल ऐवढे लोकं जमले होते मग गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय सुरक्षा असताना देखील नेत्यांना मारण्याचा प्रयत्न कसा केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला की, उद्धव ठाकरे हे मुंबईतील दाऊद इब्राहिम आहेत, मुंबईत आता गॅंगवॉरला सुरुवात झाली आहे. भाजप कार्यकर्तेही तांडव करून दाखवतील असे वक्तव्य नितेश राणे यांनी यावेळी केले.

तसेच म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायमचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, गृहमंत्री वळसे पाटलांनी काही दिवस लंडनला फिरायला जावे, परत आल्यावर महाराष्ट्रात तुम्हाला असे गुन्हे होताना दिसणार नाहीत, कारण तोपर्यंत मी सगळी मुंबई साफ करतो, असे राणे म्हणाले.

तसेच तुम्ही पोलिस विभागाला 24 तासासाठी सुट्टीवर पाठवा मग आम्ही दाखवतो यांना शांत कसं बसवायचं, सगळ्या मुंबईत आम्ही स्वच्छता मोहिम राबवतो असं नितेश राणे म्हणाले. तसेच राज्यातील जनतेला सुरक्षा पोहचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं असतं पण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्ले केले आहेत तर सामान्य जनता कशी जगेल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले, ठाकरे सरकार हे नामर्दासारखं सोमय्यांवर हल्ला करत आहे. त्यांचं सरकार अशा पद्धतीने चालत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे. अगर आप पत्थर की लढाई करेंगे तो हम पत्थर का जवाब पत्थर से देंगे असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला केला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now