हेच चित्र गणेशोत्सवात देखील पाहायला मिळालं. यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी चर्चेत आला. यातीलच महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात स्थापन झालेलं शिंदे – फडणवीस नवं सरकार..! विशेष बाब म्हणजे, यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय रंग देखील लागलेले पाहायला मिळाले.
काही ठिकाणी रूसवे – फुगवे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी कट्टर विरोधक बाप्पाच्या दर्शनाला एकत्र आलेले पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे, राजकीय नेत्यांचे विविध रंग गणेशोत्सवात राज्याला पाहायला मिळाले. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.
दहा दिवसांनंर राज्यभरात काल गणरायाला निरोप देण्यात आला. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच राज्यात काही ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला. तर दुसरीकडे गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेची हवा असल्याच पाहायला मिळालं.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. एकीकडे शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवात बाप्पाच्या मिरवणूक शिवसैनिकांनी शिवसेनेच्या गाण्यावर ठेका धरल्याच पाहायला मिळालं. हा व्हिडिओ कोल्हापुरातील आहे.
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेना आणि क्षीरसागर यांच्यात जोरदार खंडाजंगी सुरु आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या मंडळाची मिरवणूक जात असताना राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानीजवळ इंगवले यांनी शिवसेनेचे गाण्यावर ठेवा धरला.
एका शिवसैनिकाने मध्यभागी शिवसेनेचा झेंडा घेतला आहे. तर आजूबाजूने अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या गाण्यावर मोठ्या आनंदात थिरकताना पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मिडियावर हा व्हीडीओ तुफान व्हायरल होतं आहे. यानिमित्ताने गणेशोत्सवात देखील यंदा राजकारण पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल