दहा दिवसांच्या लाडक्या पाहुण्यांना अखेर निरोप देण्यात आला आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वांचेच डोळे भरून आले. वर्षातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव..! मात्र दोन वर्षे कोरोना विषाणूने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.
मात्र यंदा दोन वर्षांची कसर गणेश भक्तांनी भरून काढली, असं म्हणायला आता हरकत नाही. बाप्पाच्या विसर्जन मिरवणूला मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी उपस्थिती लावली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मात्र याच आनंदाला गालबोट लागल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले.
दरवर्षी अनेक जण गणेश विसर्जन करताना आपला जीव गमवतात. यंदा देखील अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे दु: खाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काल राज्यात विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 17 जणांचा बुडून मृत्यू झाला. 4 भावंडांसह 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील महेंग्रगड जिल्ह्यात कालव्यामध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू (death by drowning) झाला आहे. तर दुसरीकडे, सोनीपत जिल्ह्यात गणेश विसर्जन करत असतानाच यमुना नदीच्या प्रवाहातून दोन तरुण वाहून गेल्याची माहिती मिळतं आहे.
तर तिकडे उत्तर प्रदेशमधील उन्नाव व संत कबीर नगरमध्ये तब्बल 7 जणांचा बुडून मृत्यू गणपती विसर्जणामुळे झाला आहे. या दुर्घेटनेत चार लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगडमध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर गणेशाची मुर्ती विसर्जनासाठी मुर्ती नदीत उतरवली.
गणपतीच्या बाप्पाच्या मूर्तीसोबत त्यावेळी 9 तरुण पाण्यात उतरले होते, ते सर्वजण पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. दिलासादायक बाब म्हणजे, यामधील सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र अन्य दोघांच्या मृतदेहाचा शोध चालू असल्याची माहिती मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल