ganesh sapkal missing after shinde dasara melava | सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक म्हणजे ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे शिंदे गट. दोन्ही गटांनी यावेळी दसऱ्याच्या दिवशी दोन वेगवेगळे मेळावे घेतले होते. बिकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घेतला होता, तर शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा घेतला होता.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी घ्यावा लागली होती. दोन्ही मेळाव्यांबद्दल सगळ्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. कोणता मेळाव्याला जास्त गर्दी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे मेळाव्यांसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते.
शिंदे गटाने जेवणही मोफत ठेवले होते. तसेच बस आणि रेल्वे देखील उपलब्ध करून दिल्या होत्या. लोकांचे लक्ष वेधू घेण्यासाठी हे केले गेले असल्याचे म्हटले जात होते. तसेच दोन्ही मेळाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे दोन्ही मेळावे चर्चेत राहिले.
अशात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला गेलेले गणेश सपकाळ हे गावी परतलेच नाहीये. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रायगडमधून दसरा मेळाव्यासाठी गणेश सपकाळ गेले होते. पण ते मेळाव्यातून बेपत्ता झालेले आहे.
गणेश सपकाळ हे पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे रहिवासी आहे. गणेश सपकाळ हे शिंदे गटाचा मेळावा पाहण्यासाठी गेले होते. ते बीकेसी मैदानात गेले होते. शिंदे गटाने केलेल्या बसनेच ते गेले होते. पण ते पुन्हा परतले नाही. मेळाव्या संपल्यानंतर सहकारी त्यांचा शोध घेत होते. पण त्यांना ते सापडले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून गणेश सपकाळ हे घरी परतलेले नाही. त्यांचा कुणाशी संपर्क सुद्धा झालेला नाही. याबाबत स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेश सपकाळ यांचा शोध सुरु आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. ते नक्की कुठे गेलेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
nashik : ‘कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला,अन्…,’ मालकाने सांगीतले नाशिकमधील बस कशी अन् केव्हा पेटली
shivsena : शिवसेनेचा भाजपला दे धक्का! विदर्भातील बडा भाजप नेता करणार शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde : भाषण सुरू असतानाच लोक उठून का गेले? एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले