ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून, याप्रकरणी संबंधित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे आता आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात गणेश नाईक यांना तात्काळ अटक करण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल, असे सांगितले आहे.
संबंधित महिलेने आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना तपासाचे निर्देश देऊन 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी राज्य महिला आयोग अँक्शन मोडमध्ये आलेला असल्याने गणेश नाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी ट्विटर वरती एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्याविरोधात नवी मुंबई पोलीस आणि नेरुळ पोलीस येथे तक्रार दाखल केली होती, असे म्हणाल्या.
यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी गणेश नाईक यांना तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल,असे म्हणाल्या. त्यामुळे आता गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी गणेश नाईक यांना तात्काळ अटक करणार : रुपाली चाकणकर@ChakankarSpeaks @mataonline pic.twitter.com/huFeWG6jQZ
— Akshay Adhav | अक्षय आढाव (@Adhav_Akshay1) April 17, 2022
झालेली घटना म्हणजे, नवी मुंबईतील एका महिलेने आठवड्याभरापूर्वी गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 1993 पासून गणेश लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. तसंच आपल्याला या संबंधातून पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचं देखील महिलेने म्हटलं आहे.
तशी रितसर तक्रार तिने पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तक्रार देऊनही कारवाई केली नसल्याने संबंधित महिलेने महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली. आता महिला आयोग योग्य ते पाऊल उचलत आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोग अँक्शन मोडमध्ये आलेला आहे.