एकता आणि अखंडतेचे अभूतपूर्व दर्शन गणेशोत्सवात दिसून येते. विशेष बाब म्हणजे लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सवामागील असलेला उद्देश नागपुरात साध्य झालेला पाहायला मिळत आहे. नागपुरातील एका मुस्लीम कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
सध्या नागपुरात याची बाप्पाची जोरदार चर्चा आहे. सोहेल खान असे या गणेश भक्ताचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे, मुस्लीम असूनही गेल्या दहा वर्षांपासून आपल्या घरी ते गणरायाची स्थापना करीत आहेत. मुस्लीम असूनही तब्बल दहा दिवस खान कुटुंबीय भक्तिभावाने गणेशाची विधीवत पूजा करतात.
दरम्यान, घरात बाप्पा असताना देखील खान यांचे कुटुंबीय नमाजदेखील नित्यनेमाने करतात. त्याहून विशेष बाब म्हणजे, ज्या रूममध्ये गणपती विराजमान आहे, त्याच रूममध्ये बाजूला नमाजही सुरू असते. यामुळे परिसरात सध्या खान कुटुंबियांच्या बाप्पाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कोणताही धार्मिक भेदभाव न करता खान कुटुंबीय बाप्पाची मनेभावे आरती करतात. घरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून खान कुटुंबीयांनी भक्तीचे एक वेगळे दर्शन आपल्याला दिले आहे. सोहेल खान यांचा मुलगा सीझान खान याच्यामुळे खान कुटुंबात बाप्पाचे आगमन होऊ लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सीझान हा मातीचा गणपती स्वतः तयार करून घरी त्याची स्थापना करायचा. त्यानंतर वडिलांनीही कसलाच भेदभाव न करता गणेशाची स्थापना करण्याची परवानगी मुलाला दिली. तेव्हापासून दरवर्षी खान कुटुंबात मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ गटात जुंपली! आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना झाप – झाप झापले, वाचा काय म्हंटलंय?
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार
थेट मुळावरच घाव! उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा माणूस फुटणार? शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट