कृषी पर्यटन हा महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. कृषी पर्यटनाच्य मध्यामातून शेतीला पैसा व प्रतिष्ठा मिळतं आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाची कास धरली आहेत. अनेक तरुण व शेतकरी यशस्वीरीत्या कृषी व ग्रामीण पर्यटन चालवत आहेत. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपले शेती मालाची विक्री करू शकतो. अशी माहिती गणेश चप्पलवार यांनी दिली
कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व शहरी पर्यटकांना आहे. याचा विचार करून शेतकऱ्याने कृषी पर्यटनाकडे वळावे. कृषी पर्यटनचे भविष्य उज्ज्वल आहे. अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच विद्यार्थी शिक्षणासह व्यवसायात नवनवीन माहिती घ्यावी. शेतीमध्ये नवीन प्रयोग केले पाहिजे. शेती टिकली पाहिजे. शेती विकली तर आपण गुलाम व मजूर व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भास्कर कोशिडगेवार, प्रमुख पाहुणे म्हणून काठेवाडीचे सरपंच सूर्यकांत पोतुलवार, प्रमुख वक्ता म्हणून गणेश चप्पलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सतीश जांभाळीकर उपस्थित होते.