पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचं नाव सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये सध्या जोरदार चर्चेत आहे. गजानन मारणेच्या सुटकेनंतर त्यासंदर्भात विविध बातम्या आणि अनेक नव्या गोष्टी बाहेर पडत आहे. तर दुसरीकडे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच गजा मारणेची सुटका झाल्याने याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटणारं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेविका व गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना जयश्री मारणे यांनी केलेला पक्षप्रवेश आणि गुंड गजा मारणे याची तुरुंगातून झालेली सुटका, सध्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला होता.
मात्र आता त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत सध्या त्यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. प्रथमेश मारणे याने दोन वर्षे विविध ठिकाणी नेऊन इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका २२ वर्षीय तरुणीने केला आहे.
तरुणीने केलेल्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे.सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुलीने तक्रारीत म्हटलं की, ‘ओळख वाढवून मैत्री कली आणि शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुलीने केली आहे.
तसेच त्याने अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादनुसार, २०२० ते २०२२ या दोन वर्षांदरम्यान प्रथमेश मारणे याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत. फिरायला घेऊन जात मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे प्रथमेशने तरुणीच्या नकळत तिचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३७६, ५०४, ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे कलम ६६ (ई) प्रमाणे प्रथमेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या मुलावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हामुळे गुंड गजा मारणे पुन्हा चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच प्रथमेश याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा झाल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अंकिता आणि विक्कीने साजरी केली पहिली होळी; एकमेकांना रंग लावतानाचा व्हिडिओ केला शेअर
यंदा कोहलीचं नशीब फळफळणार? ‘हा’ लकीचार्म खेळाडू RCB मध्ये सामील, ज्या टीमकडून खेळतो तोच संघ हमखास जिंकत
…ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर सेनेच्या ढाण्या वाघाची गर्जना
‘भाजपाला झुंडचा इतका तिरस्कार आणि द काश्मिर फाईल्सचा इतका पुळका का?’